Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

अन्नपुर्णेश्वरी नगर येथे पावसाच्या पाण्यामुळे बेघर!

  बेळगाव : बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. वडगाव परिसरात देखील अनेक ठिकाणी पाणी घरात शिरून बरेच नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती वडगाव अन्नपुर्णेश्वरी नगर 6 क्रॉस येथे सुद्धा विष्णू दत्ताराम दरेकर यांची झाली आहे. घरातील छप्पर गळत असून घरचा परिसर पाण्याने …

Read More »

ओमनगरमध्ये पावसाच्या पाण्याने रहिवाशी चिंतेत

  बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावात जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही वसाहती पाण्याखाली गेल्या असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या तीव्र होऊनही लोकप्रतिनिधी व अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुसळधार पावसाने बेळगावातील जनता अक्षरश: हैराण झाली आहे. …

Read More »

बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

  बेळगाव : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या स्वच्छ विद्यालय अभियानात सहभागी झालेल्या बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलला स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वच्छ भारत अभियानात सर्व शाळांचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सहभागी होण्याची संधी दिली होती. त्यात बेळगावच्या शिंदोळी पब्लिक स्कूलचाही सहभाग होता. शिंदोळी …

Read More »

कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर

  बेळगाव : महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व उपनद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रातील कोकण भागात वरुणराजाने कहर केला आहे. कृष्णा नदी व तिच्या उपनद्या, वेदगंगा व दूधगंगा नद्यांना पूर आला होता. परंतु कालपासून महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी …

Read More »

देसूर क्रॉसजवळ लॉरी-दुचाकी धडक : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

बेळगाव : दुचाकी आणि लॉरीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील देसूर क्रॉसजवळ घडली. गजपती गावातील अक्षय हिरेमठ याचा मृत्यू झाला. आणखी एक नागय्या हिरेमठची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  बेळगाव ग्रामीण पाेलिस ठाण्यात ही …

Read More »

मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा : किरण जाधव

  बेळगाव : कर्नाटक मराठा समाज अधिवृद्धी निगम कार्यालयाचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम बेंगळूर येथील आरमने मैदान, त्रिपुरवासिनी, बेंगळूर येथे मंगळवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पार पाडण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मराठा समाज बांधवांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी …

Read More »

वडगाव कारभार गल्ली येथे घर कोसळून नुकसान; श्रीराम सेनेकडून मदत

बेळगाव : वडगाव कारभार गल्ली येथील लक्ष्मी पारकर यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगाव परिसरात सध्या पावसाचा जोर सुरू आहे. अतिपावसामुळे कारभार गल्ली वडगाव येथे घराची भिंत कोसळली. याची माहिती श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांना देण्यात आली. तातडीने कोंडुस्कर यांनी घटनास्थळी भेट …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायत हद्दीतील अवचारहट्टी येथे विद्युत्त अदालत संपन्न

बेळगाव : शनिवार दि. 16/07/2022 रोजी सकाळी हेस्कॉमच्या वतीने विद्युत्त अदालत संपन्न झाली. यावेळी अवचारहट्टी गावामधील विजेच्या संदर्भात गावातील नागरिकांनी व येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्यांनी गावामधील विविध विद्युत्त समस्या मंडल्या. शेतातील विद्युत्त खांब व्यवस्थित करून देणे, विजेचे जूने खांब बदलून नवीन खांब बसविणे, गावातील खासगी जागेत असलेले टीसी (ट्रान्सफार्मर) …

Read More »

मराठा विकास महामंडळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या : राष्ट्रवादी काँग्रेस

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने स्थापन केलेल्या मराठा विकास महामंडळाचे शिवाजी महाराज मराठा समाज विकास महामंडळ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव येथे जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. कर्नाटक सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, मराठा विकास महामंडळासाठी सरकारने …

Read More »

उज्ज्वलनगर परिसर जलमय!

  बेळगाव : बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागून असलेल्या उज्ज्वल नगरमध्ये ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गासह सर्व्हिस रोडवर वाहणारे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी स्थानिक आमदार अनिल बेनके यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. …

Read More »