Monday , March 9 2026
Breaking News

बेळगाव

खासदार ते पंचायत सदस्यापर्यंत सगळी पदे माझ्याच घरी… कार्यकर्ते फक्त धुणीभांडी करी…

  भारतात घराणेशाहीचा मुद्दा हा कायमच चर्चेत राहिला आहे. पक्ष कोणताही असो प्रस्थापित नेता आपल्या कुटुंबातील लोकांना पुढे करून पदे लाटण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. पद मिळाले नाही की पक्ष चांगला नाही तर पक्षाला राम राम करून नवीन घरोबा थाटतात. असाच एक घराणेशाहीचा उदय बेळगावमध्ये झाला आहे. सगळी पदे आपल्यालाच मिळावी …

Read More »

समितीचे उमेदवार महादेव पाटील शुक्रवारी अर्ज दाखल करणार

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवार दि. 19 रोजी शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून शुक्रवारी सकाळी दहा वाजता मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयांकडे आज दाखल करण्यात येणार आहे. बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, …

Read More »

भव्य शक्तिप्रदर्शनाने जगदीश शेट्टर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार रोड शो द्वारे निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. येथील समादेवी गल्ली येथून निघालेला रोड शो खडेबाजार, शनिवार खुट, काकतीवेस रोड, राणी चन्नम्मा सर्कल मार्गे पुढे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” कार्यक्रम

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि.23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे तरुणपिढी मोबाईलकडे वळली असल्याने ते वाचनालयाकडे वळत नाहीत, एवढेच नव्हे तर कार्यक्रमातही तरुणांची उपस्थिती अभावाने जाणवते. पण शिक्षक व प्राध्यापकांची निरीक्षणे याबाबतीत वेगळी …

Read More »

ब्रेक निकामी झाल्याने कित्तूरजवळ बस उलटली!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील तिम्मापुर गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने राजहंस बस उलटली. हुबळीहून बेळगावकडे येणारी राजहंस बस सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेडवर उलटली. बसमधील दहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read More »

समर्थ नगर येथे अडीच दिवसाचे पारायण : श्री कपिलेश्वर देवस्थान येथून समर्थ नगर पर्यंत दिंडी मिरवणूक

  बेळगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मेन रोड समर्थ नगर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 15/4/2024 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता या दिंडी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. श्री कपिलेश्वर देवस्थान येथुन समर्थ नगर पर्यंत ही दिंडी मिरवणूक काढण्यात …

Read More »

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेळगावात ३० रोजी जाहीर सभा

  बेळगाव: कर्नाटक सरकारच्या अन्यायविरुध्द लढा देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे. सीमाभागातील मराठा समाज व मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना द्यावी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक १६ रोजी अंतरवाली …

Read More »

कागवाड-मिरज चेकपोस्टवर 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी आज सुमारे 16 लाख रुपये जप्त केले आहेत. कागवाड मतदान केंद्राच्या कागवाड-मिरज चेकपोस्टवर येथे आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाहन क्रमांक केए 23, पी 1445 (सुझुकी बलेनो) मध्ये कागदपत्राशिवाय 16,05,600 रुपये घेऊन जात होते. जप्त करण्यात आलेली …

Read More »

अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व एनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन

  बेळगाव : “कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या सायमन एक्झिब्युटर्स यांचे हे प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. तणावग्रस्त जीवनामध्ये माणसाला आनंदात वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारची प्रदर्शने उपयोगी ठरतात समस्त बेळगावकर या प्रदर्शनाचे निश्चित स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो” असे उद्गार बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, …

Read More »

शिव-भीम शक्तीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  बेळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्सव महाराष्ट्र एकीकरण समिती व दलित संघटनेच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, लोकसभा निवडणुकीचे उमेदवार महादेव पाटील व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प कलाकृतीला …

Read More »