Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

मराठा मंडळ महाविद्यालयाला नॅकचा ‘ए प्लस’ ग्रेड

बेळगाव : सुभाषनगर येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाला नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यमापनामध्ये ‘ए प्लस’ ग्रेड मिळाला असून या पद्धतीने बेळगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मराठा मंडळाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाने यापूर्वी तीन नॅक यशस्वीरित्या पूर्ण केले …

Read More »

उचगाव येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव (प्रतिनिधी) : उचगाव येथील शेतकऱ्याने आपल्या राहत्या घराशेजारील शेतवडीतील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. घरच्या भाऊबंदकीच्याच शेतीच्या पैशांच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातून ही आत्महत्या त्याने केल्याचे त्यांच्या मुलाकडून सांगितले जात होते. या घटनेची समजलेली अधिक माहिती अशी की, श्रीकांत शंकर जाधव (वय 56) हा सकाळी …

Read More »

मराठा सेवा संघ बेळगांव यांच्यावतीने रविवारी मराठा युवा उद्योजक मेळावा

बेळगाव : मराठा समाजाच्या युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने मराठी युवकांना संघटित करून व्यवसायाबद्दल असलेल्या अडीअडचणी दूर करून मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगांव यांच्या वतीने रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता मराठा युवा उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गणेश कॉलनी संभाजीनगर, वडगांव येथील मराठा सभागृहामध्ये …

Read More »

शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गणवेश वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गणवेश वितरण व इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. संतोष मंडलिक तर प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. दीपक देसाई, श्री. पुंडलिक मल्‍हारी पाटील, प्रशांत पुंडलिक पाटील, कल्लाप्पा इराप्पा देसुरकर …

Read More »

बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा कन्हैयालाल हत्येच्या निषेधार्थ निदर्शने

बेळगाव : समाजमाध्यमांवर नुपूर शर्मांचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू टेलर कन्हैयालाल याची हत्या केल्याच्या निषेधार्थ बेळगावात हिंदुत्ववादी संघटनांनी आज रास्ता रोको करून जोरदार निदर्शने केली. मोहम्मद पैगंबरांचा अवमान करणार्‍या भाजपच्या पूर्वाश्रमीच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केलेल्या उदयपूर येथील हिंदू टेलर कन्हैयालाल यांची धर्मांधांनी नुकतीच तलवारीने गळा चिरून …

Read More »

उद्यमबाग येथे एकाची निर्घृण हत्या

बेळगाव : धारदार हत्याराने वार करून युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगावातील उद्यमबाग येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बेळगावातील मजगाव येथील आंबेडकर गल्लीतील रहिवासी २७ वर्षीय युवक यल्लप्पा शिवाजी कोलकार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तीक्ष्ण हत्याराने भोसकून …

Read More »

शाहूनगर येथे एकाची गळफास लावून घेऊन आत्महत्या

बेळगाव : साई कॉलनी मेन रोड शाहूनगर येथे एका व्यक्तीने तीन मजली इमारतीला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी जक्कप्पा बिर्जे (वय 65) असून ते जेएनएमसी येथे वॉचमेनचे काम करत होते. घटनास्थळी एपीएमसी पोलीस जाऊन घटनेचा पंचनामा केला. अद्याप आत्महत्येचे कारण …

Read More »

गुंडांवर नेहमीच अंकुश असणार : रवींद्र गडादी

बेळगाव : खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकण्याची मोहीम पोलीस खात्याने हाती घेतली आहे. अजूनही काही गुंडांच्या घरावर धाडी टाकण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी स्पष्ट केले. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पोलीस उपायुक्तांनी ही माहिती दिली. या कारवाईसाठी एसीपी व सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली 26 …

Read More »

सिंगल यूज प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी!

बेळगाव : केंद्र सरकारने येत्या 1 जुलैपासून देशात एकेरी वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात काल मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर या सर्वांवर …

Read More »

एनसीसी छात्रांसाठी वाहतूक जनजागृती कार्यक्रम संपन्न

बेळगाव : जाधवनगर येथील 26 कर्नाटका एनसीसी बटालियनतर्फे एनसीसी छात्रांसाठी आयोजित वाहतूक कायदा व नियम जनजागृती कार्यक्रम आज बुधवारी पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक उपस्थित होते. नाईक यांनी एनसीसी छात्रांना वाहतुकीबद्दल असणारे कायदे, नो-पार्किंग, ड्रिंक अँड ड्राइव्ह, वेगावर नियंत्रण …

Read More »