Sunday , December 7 2025
Breaking News

खानापूर

वनहक्क कायद्याची खानापूर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; निवेदनाव्दारे मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : वनहक्क कायद्याची खानापूर तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा मागणीचे निवेदन उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील अनेक शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यांना वनहक्क मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे लढत आहेत. …

Read More »

आमवस्येनिमित्त मलप्रभा नदीवर भाविकांची गर्दी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली. मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात …

Read More »

खानापूरातील युवक नदीत बुडाला; मलिकवाड येथील घटना

मलिकवाड (ता. चिक्कोडी) : खानापूर तालुक्यातील हारूरी येथील युवक दुधगंगा नदीत बुडाला. मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे बुधवारी (दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर (वय २६) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सदलगा पोलिस व अग्निशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. आपल्या काकाकडे …

Read More »

असोगा देवस्थानावरील प्रशासक उठवा, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानावर 2014 साली जिल्हाधिकारी, बेळगांव यांनी प्रशासक नेमला. नवीन देवस्थान कायद्यानुसार फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी अथवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी प्रशासक नेमता येतो व त्यानंतर जिल्हा धार्मिक परिषद नियमानुसार वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नवीन कमिटी नेमण्यासाठी हिंदु धर्मीय जनतेकडून अर्ज …

Read More »

काळ्यादिनी दोन्ही गटांनी एकत्रित निषेध करावा

खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्या दिनी म. ए. समितीच्या अरविंद पाटील आणि दिगंबर पाटील गटाने एकत्रित येऊन निषेध सभा घ्यावी, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शिवस्मारकात झालेल्या आजच्या बैठकीत केली. यासंदर्भात दोन्ही अध्यक्षांना पत्र देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तालुका समितीतील दोन्ही गट गेल्या काही वर्षांपासून दोन …

Read More »

डॉ. प्रभाकर कोरे सोसायटी अंकली शाखेची खानापूरात सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात डॉ. प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सहकारी नि. अंकली शाखेचे उद्घाटन सोहळा शनिवारी विरेश कॉम्प्लेक्स पहिला मजला येथे पार पडला. यावेळी शाखेचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर, माजी राज्यसभा सदस्य व केएलई संस्था कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, मुख्यसचेतक विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार दिगंबर पाटील, …

Read More »

जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांकडून गाळ्यांची प्रतिक्षा!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारक करत आहेत गाळ्यांची प्रतिक्षा. याबाबतची माहिती अशी की, गेल्या सहा महिन्यापासून जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारक अद्याप अंधारातच आहेत. रस्ता रूंदीकरणाचे कारण पुढे करून जांबोटी क्रॉसवरील 51 गाळेधारकांना उधळून लावले. गेल्या सहा महिन्यापासून गाळेधारक कामाविनाच जगत आहेत. त्यांच्या कुटुंबाना दोन …

Read More »

खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत राहून तालुक्याचा विकास साधेल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शिवस्मारकात आम आदमीच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना बेळगाव उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, आम आदमी दिल्ली सरकारने शाळा आणि रूग्णालयाचे आधुनिकीकरण केले. दिल्लीत महिलांना मोफत प्रवास, तसेच संरक्षणही आहे. अशा अनेक सोयी, सुविद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. अशाच प्रकारे खानापूर तालुक्यात आम आदमी सक्रियपणे कार्यरत …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसजवळचा धोकादायक खड्डा बुजवणार कधी?

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळचा खड्डा गेल्या सहा महिन्यापासून तसाच आहे. याकडे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. तर तालुक्याच्या आमदारांनी याची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे या खड्ड्याचा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाचे काम जत-जांबोटी महामार्गावरील परिश्वाड ते खानापूर …

Read More »

आत्महत्या की खून? : रेल्वे मार्गावर सापडला मृतदेह

बेळगाव : खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली सापडल्याने त्याचे शिर आणि धड शरीरापासून अलग …

Read More »