Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक बसेस परत महाराष्ट्रात

तपासणी कडक : महाराष्ट्रात रुग्ण वाढलेच्या कारणाने तपासणी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून मंगळवार तारीख 13 रोजी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची तपासणी …

Read More »

निपाणी नगरपालिका बैठकीत गोंधळ; सर्व विषयांना मंजुरी

सत्ताधारी- विरोधक आक्रमक निपाणी (संजय सुर्यवंशी) : येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिवंगत नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे सभागृहात मंगळवारी (ता.13) सकाळी झाली. सुरुवातीपासूनच गोंधळाच्या वातावरणात सभेला सुरुवात होऊन विषयपत्रिकेवरील सर्वच 26 विषयावर चर्चा न करता गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी घेऊन सत्ताधार्‍यांनी दीड तासातच सभा आटोपती घेतली. यावेळी मुन्सिपल हायस्कूल सरकारला हस्तांतरण करण्याच्या …

Read More »

हंचिनाळ येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

कोगनोळी : हंचिनाळ येथील पाटील मळ्यातील शेतात उसाचा पाला काढत असताना सापाने  पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अमृत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसारसौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. नेहमीप्रमाणे येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात श्री. दादासो पाटील यांच्या …

Read More »

काळाचा घाला; देवदर्शनाहून येताना ट्रकला धडक; दोन युवक ठार

चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत …

Read More »

सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

दोन कॉन्स्टेबलचा समावेश : 40 हजाराची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात निपाणी : पान मसाला कारखानदारांकडून 40 हजाराची लाच स्वीकारताना सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल वर एसीबीने कारवाई केली. गुरुवारी (ता.8) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. बऱ्याच वर्षानंतर एसीबीने ही कारवाई केल्याने निपाणी आणि सदलगा …

Read More »

निपाणी तालुक्यातील लसीकरणाचा गोंधळ संपणार तरी कधी?

दिवसभर नागरिकांच्या रांगा : अपुर्‍या पुरवठ्याचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना साथीचा आजार व संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर घेण्याचे आवाहन प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्ष लसीचा होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी यामुळे मागील पंधरा दिवसापासून निपाणी शहरासह तालुक्यात प्रचंड गोंधळाचे …

Read More »

निपाणी पालिकेची सभा वादळी ठरण्याची चिन्हे!

13 रोजी सर्वसाधारण सभा : तब्बल 26 विषयांवर होणार चर्चा निपाणी : तब्बल दोन वर्षांपासून निपाणी पालिका सभागृहाला नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची प्रतीक्षा होती. ती प्रतिक्षा संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. आता मुहूर्त ठरला असून मंगळवारी (ता.13) 11 वाजता ही सभा होणार आहे. त्यामध्ये …

Read More »

निपाणी तालुक्यासाठी स्वतंत्र 10 हजार लसीची शिफारस

मंत्री शशिकला जोल्ले : दहावी परीक्षेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना लसीकरण निपाणी : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य खाते पोलीस प्रशासन अंगणवाडी व अशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यामुळेच निपाणी तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांनी बनवली विज्ञान मॉडेल!

भंगार साहित्याचा वापर : लॉकडाऊन काळाचा सदुपयोगनिपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शाळाही बंद राहिल्या. या काळात अनेकांनी विविध छंद जोपासले. मात्र निपाणी शहरातील आंदोलननगर, शाहूनगर परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने भंगार साहित्यातून अनेक प्रकारची विज्ञान मॉडेल बनवले आहेत. आश्रय नगरमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही किमया …

Read More »

शिक्षकांची कोविड ड्युटी रद्द करावी

माध्यमिक शाळा नोकर संघटना : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सूर्यवंशी) : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असताना देशात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण सर्वाधिक आढळल्यामुळे सतर्क झालेल्या कर्नाटक सरकारने आंतरराज्य सीमेवर निर्बंध कडक केले आहेत. हे करताना पुन्हा एकदा शिक्षकांना कोविड …

Read More »