प्लास्टिक कचऱ्याचीही भर; पालिकेच्या सूचनेकडे नागरिकांची पाठ निपाणी (वार्ता) : नगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षणासाठी तयारी सुरू असताना दुसरीकडे काही महत्वाच्या गोष्टींवर अद्यापही केवळ प्रबोधन, जनजागृतीच्या रुळावरच गाडी चालल्याचे चित्र आहे. यात प्रामुख्याने कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत फारशी प्रगती होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेकडून नागरिकांना ओला-सुका कचरा स्वतंत्र देण्याचे आवाहन केले …
Read More »‘शुक्रास्त’मुळे निपाणी बाजारपेठ थंड
व्यावसायिकांमध्ये चिंता; फेब्रुवारीत वाजणार बॅण्डबाजा निपाणी (वार्ता) : दिवाळी झाली, तुलसी विवाह झाला. मात्र सध्या शुक्रास्त सुरू झाल्याने थेट फेब्रुवारीपर्यंत वधूवरांच्या शुभविवाहाची ‘टाळी’ वाजणे थांबले. तब्बल ५९ दिवस विवाह, भूमिपूजन, गृहप्रवेश व सर्वच शुभकार्य थांबल्याने निपाणीतील व्यापारीपेठ हिवाळ्यात थंड झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक चिंताग्रस्त बनले आहेत. फेब्रुवारी ते जुलै महिन्यात …
Read More »मोदगा भावेश्वरी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक
दड्डी : मोदगा (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी यात्रेनिमित्त नियोजन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती हुक्केरी तालुका तहसीलदार श्री. बलराम कट्टीमनी यांच्यासह यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे 2, 3, 4 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी बैठक होती. बैठकीच्याअध्यक्षस्थानी भावेश्वरी देवी …
Read More »सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक उमेदवारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्नाटक नागरी सेवा पदांसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना नियमांनुसार यासोबतच आणखी ५ वर्षांची सूटही लागू राहणार आहे. ही …
Read More »राज्यपालांचा सरकारचे भाषण न वाचताच सभागृहातून काढता पाय
संयुक्त अधिवेशनात अभूतपूर्व गदारोळ बंगळूर : राज्य विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात आज अभूतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारने तयार केलेले भाषण पूर्णपणे न वाचता, स्वतः तयार केलेल्या काहीच ओळी वाचून सभागृहातून बाहेर पडल्याने मोठा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप-धजद यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली …
Read More »सुसज्ज क्रीडांगण निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यापर्यंत प्रयत्न करणार
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; डॉ. आंबेडकर क्रीडांगणच्या फलकाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशवासीयांना यांना न्याय दिला आहे. या त्यांच्या नावे निपाणीत सुज्ज क्रीडांगण करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून होती. आता त्याच्या पूर्ततेसाठी खासदार, पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे मत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी …
Read More »बोरगाव येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त पालखी मिरवणुक; विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शहराचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा भक्तीभावाने आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवाउद्योजक अभिनंदन पाटील व सहकार रत्न उत्तम पाटील यांनी यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी सिद्धेश्वर चरणी नतमस्तक होऊन बोरगाव शहराची …
Read More »खानापूर तालुका माध्यमिक शाळा नोकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी करंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल कदम
कणकुंबी : खानापूर तालुका माध्यमिक शाळा नोकर सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी करंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल कदम तर उपाध्यक्षपदी गणेबैल हायस्कूलचे मुख्या. राजु पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सदर सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक मागील आठवड्यात बिनविरोध पार पडली होती. २०२६ ते २०३१ पर्यंत होणाऱ्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया दि. …
Read More »रासलीला व्हिडीओ प्रकरण : वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्रराव निलंबित
बंगळूर : महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नागरी हक्क अंमलबजावणी संचलनालयाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्रराव यांना राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश मंगळवारी रात्री उशिरा जारी करण्यात आला. सरकारी कर्तव्यावर असताना, गणवेशातच महिलेसोबत अयोग्य वर्तन …
Read More »चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील कापोली (ता. खानापूर) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अमानुष मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 10/2026 अन्वये आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), (2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta