रयत संघटनेतर्फे तहसीलदार, हेस्कॉमला निवेदन ;२५ जानेवारीनंतर आंदोलन छेडणार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या कृषी पंपालागेल्या ८ ते १० वर्षांपूर्वी, अक्रम सक्रम योजनेअंतर्गत, आरआर क्रमांक देण्यात आले होते. शिवाय प्रत्येक शेतकऱ्याकडून ५० रुपये वसूल केले जात होते. आता शेतकऱ्यांच्या पंपांचे कनेक्शन जोडले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. …
Read More »जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाल्याने मगदूम, हावले यांचा बोरगावमध्ये सत्कार
निपाणी (वार्ता) : बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरसेवक अभयकुमार मगदूम व नगरसेविका शोभा हवले यांची बेळगावी जिल्हा प्लॅनिंग कमिटीपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आण्णांचा सत्कार करण्यात आला. उत्तम …
Read More »मेरडा……. देवीचं आजोळ निघालं, हलशीला, मानाच्या ओटीने परंपरा उजळायला!
काही नावं उच्चारली की ती केवळ शब्द न राहता आठवणी जाग्या करतात. मेरडा हे असंच एक नाव आहे. हे नाव घेताच मन नकळत वाकतं, कारण मेरडा म्हणजे फक्त एक गाव नाही, ते देवीचं आजोळ आहे. आजोळ म्हणजे नात्यांची पहिली शाळा, मायेचा पहिला हात, श्रद्धेची पहिली ओळख आणि संस्कारांची पहिली …
Read More »हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या विकासासाठी अनुदान मंजूर करा
शाळा सुधारणा कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे मागणी खानापूर : लक्ष्मी यात्रेपूर्वी हलशी येथील सरकारी मराठी शाळेच्या विकासासाठी अनुदान मंजूर करावे अशी मागणी शाळा सुधारणा कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. मंगळवारी हलशी येथे बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार हलगेकर यांनी शाळा सुधारणा कमिटी व …
Read More »कर्नाटकातून ईव्हीएम हद्दपार; जीबीए, जिल्हा-तालुका पंचायत व ग्रामपंचायत निवडणुका मतपत्रिकेवरच
राज्य निवडणूक आयुक्त संग्रेश; जिल्हा, तालुका पंचायत निवडणुका मे-जून महिन्यात शक्य बंगळूर : आगामी ग्रेटर बंगळुर प्राधिकरण (जीबीए), जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच ग्रामपंचायत निवडणुका मतपत्रिकेवरच घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेश यांनी दिली. जीबीए क्षेत्रासाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते …
Read More »नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील जिथे क्रांतिकारी सांगोली रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती त्या वीरभूमीमध्ये संगोळी रायण्णा संग्रहालय आणि रायण्णा पुतळ्याचे लोकार्पण कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा संग्रहालय (वीरभूमी) उद्घाटन, समाधीस्थळाजवळील तलावात संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन …
Read More »शुभम शेळके यांना हद्दपार करण्यासाठी आत्ता करवे चिकोडी तालुका घटक रस्त्यावर
बेळगाव : सीमाभागात सातत्याने मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर ‘गुंडा ॲक्ट’ अंतर्गत कारवाई करून त्यांना हद्दपार करावे, या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या चिकोडी तालुका घटकाने कोल्हेकुई सुरु केली आहे. यासंदर्भात चिकोडीच्या तहसीलदारांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले असून, शुभम शेळके यांना …
Read More »डीजीपी रामचंद्र राव यांचे कार्यालयातच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल
बेंगळुरू : सध्या डीसीआरई म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी डीजीपी रामचंद्र राव यांचा कार्यालयातच अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डीजीपी रामचंद्र राव यांनी ड्युटीवर असताना आपल्या कार्यालयातच अनेक महिलांशी अश्लील चाळे केल्याचे, त्यांना मिठी मारल्याचे आणि चुंबन घेतल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे सबंध पोलिस विभागाची प्रतिष्ठा …
Read More »२९ जानेवारीला परिवहन कर्मचाऱ्यांचे ‘बंगळुर चलो’ आंदोलन
बंगळूर : पगार आणि वेतन सुधारणांशी संबंधित दीर्घकाळापासून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत केएसआरटीसीसह राज्यातील चार राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी २९ जानेवारी रोजी ‘बंगळुर चलो’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. सरकारशी वारंवार झालेल्या चर्चांमधून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळांच्या …
Read More »कर्नाटक सरकारची एक हजार दिवसपूर्ती; १३ फेब्रुवारीला हावेरीत भव्य रॅलीचे आयोजन
सलीम अहमद; लोकाभिमुख कामांचा लेखाजोखा मांडणार बंगळुर : राज्य सरकारचे एक हजार दिवस पूर्ण होत असतानाच्या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारी रोजी हावेरी येथे भव्य रॅली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सरकारचे मुख्य प्रतोद सलीम अहमद यांनी दिली. आज हावेरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, अधिवेशनादरम्यान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta