खानापूर तालुका समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खानापूर येथील शिवस्मारक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. उपोषणादरम्यान सभा देखील झाली यावेळी व्यासपीठावरून खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबर पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना …
Read More »दोन मुलींची हत्या करून आईची आत्महत्या
पेरियापट्टण येथे दुर्दैवी घटना बंगळूर : म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापट्टण तालुक्यातील बेथाडपुर येथे शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली. २५ वर्षीय महिलेने तिच्या दोन लहान मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत महिलेचे नाव अरबिया भानू (२५) असून ती बेथाडपुर येथील सुन्नदा बीडी परिसरातील रहिवासी जमरुद शरीफ यांची …
Read More »…म्हणे कर्नाटकात राहणारे समितीचे लोकही कन्नडीगच; शिवकुमारानी उधळली मुक्ताफळे!
आता लाल-पिवळ्या ध्वजाची सक्ती बंगळूर : “मला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातील निदर्शनाबद्दल कोणतीही माहिती नाही. गृहमंत्र्यांकडे त्याबद्दल माहिती असू शकते. एकीकरण समितीचे लोकही कन्नडीगच आहेत. त्यांचे परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी मुक्ताफळे राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उधळली. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीने काळ्या दिनानिमित्त काढलेल्या अभूतपूर्व मिरवणुकीबाबत …
Read More »शिवसेना नेत्यांना पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले
निपाणी : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मूक फेरीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले, यामुळे तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब …
Read More »बोरगावमधील किल्ला स्पर्धेत राजे ग्रुप विजेता
नगरसेवक शरद जंगटे फाउंडेशनतर्फे आयोजन; स्पर्धेला बालचमूसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जंगटे फाउंडेशनतर्फे यंदाच्या दिवाळी निमित्त शरद जंगटे यांनी किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोरगाव आणि उपनगरातील बालचमू आणि युवकांनी नानाविध प्रकारचे आकर्षक गड किल्ले साकारले होते. त्यामध्ये निकम गल्लीतील राजे ग्रुपने प्रथम क्रमांक …
Read More »निपाणीमधील कुत्र्यांच्या हल्ल्यातील रुग्णांना बोरगाव अरिहंततर्फे मदतीचा धनादेश
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बसवाणनगर मधील नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला झालेला होता. त्यामध्ये सात जणांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. अशा रुग्णांना बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यात आले. नगरसेवक शौकत मनेर, दत्ता नाईक, संजय पावले, माजी …
Read More »प्रति टन साडेतीन हजारासाठी तवंदी घाटात एल्गार!
कारखाने सुरू करू देणार नाही : राजू पोवार यांचा कारखानदारासह सरकारला इशारा निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, महापुर, विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस पिक घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा कर्नाटक राज्य …
Read More »इटगी स्कूल दाखला प्रकरण : संस्था चालकांनी आडमुठी भूमिका घेऊ नये : खानापूर ब्लॉक काँग्रेस
खानापूर : आज पहाटे ४.३० वाजता बीईओ ऑफीसमध्ये सुरू असलेले इटगी विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरते कायदेशीर बाबींमुळे स्थगित करण्यात आले आहे. शेवटी आज पहाटे ४.३० वाजता पालक व सरकारी अधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा होऊन इटगी विद्यार्थ्य्यांचे आंदोलन तात्पुरते २-३ दिवसांसाठी स्थगित केले आहे. डीडीपीआय यांनी पहाटे ४ वाजता व्हीडीओ द्वारे …
Read More »इटगी शाळा दाखला प्रकरण : दाखले मिळाल्याशिवाय बीईओ ऑफिस सोडणार नाही; विद्यार्थी व पालकांचा ठाम निर्धार
खानापूर : इटगी येथील राणी चन्नम्मा शाळेच्या विद्यार्थ्यांचे दाखले न दिल्याच्या प्रकरणाने अखेर प्रशासन हादरले असून, गुरुवारी मध्यरात्री खानापूर शिक्षण विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी बीईओ कार्यालयात ठिय्या धरत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रात्री 1.30 वाजता जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) स्वतः खानापूर येथे दाखल झाल्या, तर रात्री …
Read More »खानापूर तालुक्यात शुक्रवारी वीजपुरवठा खंडित
खानापूर : हेस्कॉमकडून वीजवाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे. खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta