Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

बलात्कार प्रकरण : माजी खासदार रेवण्णांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला

  बंगळूर : अत्याचार आरोप प्रकरणासंदर्भात माजी धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी दाखल केलेला जामीन अर्ज सलग दुसऱ्यांदा लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचे न्यायाधिश संतोष गजानन भट यांच्या खंडपीठाने फेटाळला आहे. हसन जिल्ह्यातील होळेनरसीपुर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अत्याचार प्रकरणासंदर्भात माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दुसऱ्यांदा दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करणाऱ्या …

Read More »

निपाणी तालुका म. ए. समिती, निपाणी विभाग युवा समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व मराठी भाषिकाना कळविण्यात येते की, अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मतिवडे ता. निपाणी हिंदुराव मोरे यांच्या घरी रविवार दिनांक 27/07/2025 सायंकाळी 6.30 वाजता बैठक आयोजित केली असून, सर्वांनी उपस्थित राहून पुढील अजेंडा …

Read More »

बंगळूर चेंगराचेंगरी प्रकरण : राज्य मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती डी’कुन्हा अहवाल स्वीकारला

  बंगळूर.: राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी न्यायमूर्ती जॉन मायकल डी’कुन्हा यांचा अहवाल स्वीकारला. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर सांगितले की, आरसीबी विजयोत्सव साजरा करण्यात सहभागी …

Read More »

रेणुकास्वामी हत्याकांड : अभिनेता दर्शनच्या जामीनावरील निर्णय ‘सर्वोच्च’ने ठेवला राखून

  एका आठवड्यात लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश बंगळूर : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या आणि उच्च न्यायालयाने जामिनावर सोडलेल्या स्टार दर्शन आणि पवित्रा गौडा यांच्यासह सात आरोपींच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला. कर्नाटक सरकारने दर्शनसह सात आरोपींचा जामीन रद्द करण्याची विनंती …

Read More »

खानापूरजवळ दुधाचा टेम्पो उलटून विद्यार्थी किरकोळ जखमी

  खानापूर : आज सकाळी खानापूर तालुक्यातील हलसाल, बिजगर्णी (माचीगड) परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने काही विद्यार्थी दुधाच्या टेम्पोमधून प्रवास करत होते. टेम्पो नंदगडच्या दिशेने जात असताना एका नाल्यावरील पुलावर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात काही विद्यार्थी नाल्याच्या पाण्यात तर काही रस्त्यावर पडून …

Read More »

बंगळुरसह राज्यात अनेक ठिकाणी लोकायुक्तांचे छापे

  भ्रष्ट अधिकाऱ्यांची कार्यालये, निवासस्थानांचा तपास बंगळूर : भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांचे छापे सुरूच आहेत. बंगळुर, म्हैसूर, कोप्पळ, बेळ्ळारी आणि मडिकेरीसह राज्यातील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आयएएस अधिकारी डॉ. वासंती अमर यांच्यासह आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयांवर छापे टाकले. छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आणली. …

Read More »

जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण २२ सप्टेंबरपासून

  ऑक्टोबर अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश बंगळूर, ता. २३: काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार, राज्य सरकारने पुन्हा एकदा नवीन सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण (जातीय जनगणना) करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही याला सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाच्या प्राथमिक बैठकीत २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर …

Read More »

मराठी भाषा प्रेरणा मंचतर्फे खानापूर तालुक्यातील गुणी विद्यार्थ्यांचा शुक्रवारी गौरव

  ओलमनी शाहू हायस्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन जांबोटी : मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव यांच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमातून दहावी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांचा गुणगौरव व रोख पारितोषिक वितरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 25 रोजी ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मराठी भाषा प्रेरणा मंच बेळगाव च्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : मुडा भूखंड वाटपाच्या संदर्भात ईडीने त्यांच्या पत्नी पार्वती यांना बजावलेले समन्स रद्द करण्याचा आदेश कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक आदेश केंद्र सरकारला चपराक असल्याची त्यांनी निकालावर प्रतिक्रीया दिली. मुडा प्रकरणासंदर्भात माझ्या आणि माझ्या कुटुंबावर बनावट आरोप करणाऱ्या …

Read More »

मुडा प्रकरण : ईडीचा अर्ज ‘सर्वोच्च’ने फेटाळला; मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी पार्वती यांना दिलासा

  बंगळूर : म्हैसूर विकास प्राधिकरण (मुडा) घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि नगरविकास मंत्री भैरथी सुरेश यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याचा राज्य उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या पत्नी पार्वती यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि …

Read More »