Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

करंबळ ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य, भाजपा कार्यकर्ते उदय भोसले यांचा अपघातात मृत्यू

  खानापूर : कौंदल येथील सामाजिक कार्यकर्ते व करंबळ ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य व भाजपाचे कार्यकर्ते उदय भोसले (वय 42 वर्ष) यांच्या दुचाकीला अज्ञात कारचालकाने पाठीमागून धडक दिल्याने उदय भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना खानापूर – बेळगाव मार्गावरील देसूर येथील पुलावर घडली. तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रशांत‌ पाटील …

Read More »

तळेवाडीतील विस्थापित कुटुंबांना मंत्र्यांच्या हस्ते 10 लाखांची मदत वाटप

  खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील २७ विस्थापित कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दिल्यानंतर आज (शनिवार, १७ मे) या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हेमाडगा येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खंड्रे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर …

Read More »

दोन कारच्या समोरासमोरील धडकेत; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  बागलकोट (दिपक शिंत्रे) : हुन्नगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ दोन कारांच्या समोरासमोरील धडकेत झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत गंभीर जखमी झालेल्या बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचे मृत्यू झाला आहे. तर संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) …

Read More »

तळेवाडीचे स्थलांतर निश्चित; उद्या वनमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी 10 लाखांचे वितरण

  खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील 27 कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली आहे. या स्थलांतर प्रक्रियेला आता अधिकृत मान्यता मिळाली असून वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्या हस्ते उद्या शनिवारी (दि. १७) हेमाडगा येथे प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित केले जाणार आहेत. बंगळुरू येथे …

Read More »

ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भाजपच्या तिरंगा यात्रेला प्रतिसाद

  बंगळूर : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ आज प्रदेश भाजपने बंगळुरमध्ये तिरंगा यात्रा काढली. त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बंगळुरातील मल्लेश्वरम येथील शिरूर पार्क ते मल्लेश्वरम येथील १८ व्या क्रॉस रोडपर्यंत निघालेल्या या तिरंगा यात्रेत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते आर. अशोक, राज्य भाजप प्रभारी …

Read More »

राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर लोकायुक्तांचे छापे

  अनधिकृत संपत्तीचा शोध; महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास बंगळूर : सात सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी आज (गुरुवार) सकाळी राज्यातील विविध भागात छापे टाकले. बंगळूर, बंगळूर ग्रामीण, तुमकुर, यादगीर, मंगळूर आणि विजयपुर येथे एकाच वेळी छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सात भ्रष्ट अधिकाऱ्यांना एकाच वेळी जाळ्यात …

Read More »

कर्ज फेडता न आल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; दोघांचा मृत्यू

  कुंदापूर : कर्ज फेडता न आल्याने आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या भीतीने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. कुंदापूरमधील तेकट्टे येथे डेथ नोट लिहून वडील आणि मुलाचा मृत्यू झाला, तर आईची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख पटली असून माधव देवाडिग (५६) आणि …

Read More »

पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देणाऱ्यास बेंगळुरू येथे अटक

  बेंगळुरू : भारत- पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढलेला आहे. यादम्यान पाकिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथून एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. शुभांशू शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. शुक्ला हा गेल्या वर्षभरापासून एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. ९ …

Read More »

विश्वभारती कला क्रीडा संघटनेतर्फे 1 जून रोजी आबनाळी येथे खुली कारगिल मॅरेथॉन स्पर्धा

  खानापूर : विश्वभारती कला क्रीडा संघटनेतर्फे 1 जून रोजी खानापूर तालुक्यातील आबनाळी येथे खुली कारगिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या विश्वभारती क्रीडा संघटनेच्या बैठकीत तिसरी कारगिल खुली मॅरेथॉन स्पर्धेसंदर्भात तालुक्यात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर स्पर्धा 1 जून रोजी सकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे. …

Read More »

खानापूरमध्ये प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा गुरुवारी उद्घाटन सोहळा

  खानापूर : खानापूर येथे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानद्वारे उभारण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री राजा शिवछत्रपती स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. मराठी साहित्य, भाषा आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी हे वाचनालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे …

Read More »