खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील बॅडमिंटन असोसिएशन कोर्ट येथे फ्रेंड्स बॅडमिंटन क्लब यांच्यावतीने बॅडमिंटन स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिल्या गटात ४० वर्षाखालील तर दुसरा गटात ४० वर्षा गटावरील गटात तर महिलांसाठी ओपन गट अशा विविध गटात स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यास्पर्धेतील विजयी स्पर्धक खालील प्रमाणे मुलीच्या गटात …
Read More »शहर विकास आघाडी-भाजपमध्येच थेट लढत
बोरगाव नगरपंचायत निवडणूक : मंत्री जोल्ले, उत्तम पाटील यांच्यात काटे की टक्कर निपाणी : बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुक 27 डिसेंबरला होणार असून या अनुषंगाने शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय हालचालीचे केंद्र असलेल्या बोरगाव नगरपंचायत ताब्यात असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या हालचालीवरून शहर विकास आघाडी …
Read More »स्त्रीभ्रूण हत्येबाबत समाजात जनजागृती व्हावी
संजयबाबा घाटगे : निपाणीत वधू-वर परिचय महामेळावा निपाणी : गेल्या काही वर्षापासून वंशाचा दिवा असावा यासाठी शहर आणि ग्रामीण भागात स्त्रीभ्रूणहत्या सुरू आहे, त्यामुळे समाजात मुलींची संख्या घटत आहे. परिणामी अनेक तरुणांना विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सोशल मीडियामुळे नातेवाईकांचा संपर्कही कमी झाला आहे. परिणामी मुला-मुलींचा समाजातील समतोल …
Read More »तंत्रज्ञानामुळे नवीन शैली हद्दपार होण्याची भीती
विनय हर्डीकर : निपाणीत बहुआयामी पुस्तकाचे प्रकाशन निपाणी : अपयश आले तर पुन्हा संघर्ष करा सगळेच संघर्ष यशस्वी होतात असे नाही, ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. भारत मातेची ओळख देशातील विविध प्रश्नांवर होते. भारत माता हे रनकुंड आहे. आता विचारांपेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भौगोलिक सीमारेषा राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञानामधील …
Read More »औद्योगिक वसाहतीसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र या
माजी अध्यक्ष शंतनु मानवी : एकत्रीत लढ्याची अपेक्षा निपाणी : येथील औद्योगिक वसाहतीबद्दल ऐकून वाचून मनाला अत्यंत कष्टदायक वेदना होत आहेत. प्रारंभापासून औद्योगिक वसाहतीचा विकास झाला. काही उद्योजकांनी प्लॉट घेऊन देखील उद्योगधंदे सुरू केल्या नव्हत्या. त्या प्लॉट आपण नवीन करून त्यावर 2016 डिसेंबर च्या पर्यंत 214 उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी …
Read More »ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण खबरदारी : मुख्यमंत्री बोम्माई
तुमकूर : परदेशात ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कर्नाटकात खबरदारीचे उपाय योजण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला मुख्यमंत्री बोम्माई यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. …
Read More »राज्यात लॉकडाऊन नाही! : आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे. ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात लॉकडाऊन जारी करण्यात येणार असल्याची शक्यता …
Read More »अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचलीची निवडणुक जाहीर
राज्यातील 61 नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणुक बंगळूर : सध्या राज्यातील 25 विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्यातील 61 शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 डिसेंबरला निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कित्तूर, उगारखुर्द, अरभावी, चिंचली, एम. के. हुबळी आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकाही याच दिवशी होणार …
Read More »चिगुळे मराठी शाळेच्या इमारतीची दुर्दशा, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील व अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिगुळे येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. चिगुळे मराठी शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालतात. मात्र शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने केवळ तीनच वर्गात सर्व …
Read More »राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी चक्क धरणातून सोडले पाणी; अधिकार्यांची चौकशी
बेंगळुरू : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल)ने लिंगनमक्की धरणातून सुमारे 500 क्युसेक पाणी सोडले जेणेकरून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग फॉल्स धबधबा पाहता यावा. अधिकार्यांनी यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकार्यांनी हा प्रताप केला आहे. कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta