Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …

Read More »

उचवडेत ३०० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा डोस

खानापूर (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) गावातील ३०० नागरिकांनी लसीकरणाचा डोस घेतला. बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ उचवडे गावात सोमवारी दि. २८ रोजी करण्यात आला.यावेळी बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षा व उचवडे गावच्या सौ. अनुसया लक्ष्मण बामणे यांनी कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत …

Read More »

निर्सगाची किमया फणसात साकारला गणेश

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा जंगलाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात विविध वनस्पती, विविध फळफळावळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.तशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील जंगलातुन विक्रीसाठी आलेल्या फणसातुन गणेशाच्या मुर्तीचा आकार साकारलेल्या फणसाचे दर्शन मिळाले.ही किमया निसर्गाची आहे.याबद्दल जनतेतून कुतूहल निर्माण झाली आहे.

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन…

खानापूर : कापोली, शिवठाण ते कोडगई रस्त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल तर पावसाळ्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उप कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिले आहे.कापोली ते कोडगई रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र …

Read More »

खानापूरात वनखात्याच्या कर्मचारी वर्गाला मास्कचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील वन खात्याच्या कार्यालयात वनकर्मचारी वर्गाला कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे जनतेला अनेक त्रास झाला. अनेकांना जीव गमवावा लागला. यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे. …

Read More »

एसएसएलसी परीक्षा वेळापत्रक जाहीर; 19 आणि 22 जुलै रोजी

बेळगाव (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या एसएसएलसी परीक्षेसाठी परीक्षा मंडळाने आता दि.19 आणि 22 जुलै अशा तारखा निश्चित केल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र दिनांक 30 जून पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे कळविण्यात आले आहे. दि. 19 रोजी आणि 22 सकाळी साडेदहा ते दुपारी 1.30. …

Read More »

विजेच्या धक्क्याने म्हशीच्या मृत्यू; जांबोटीतील दुर्घटना

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील जांबोटी राजवाड्याजवळील सातेरी मंदिर पाशी दुभत्या म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २६ रोजी रोजी घडली.यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, जांबोटी गावचे शेतकरी नारायण इंगळे यांनी आपली जनावरे चरावयास नेली होती. सातेरी मंदिराजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळ म्हैस जाताच ट्रान्सफॉर्मर विद्युत प्रवाह वाहिल्याने …

Read More »

कापोली शिवठाण ते कोडगई रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी यासाठी सोमवारी आंदोलन

खानापूर : गेल्या अनेक महिन्यापासून खराब झालेल्या कापोली शिवठाण ते कोडगई रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी १०.३० खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शिवठाण येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.कापोली ते …

Read More »

खानापूर बेळगाव हद्दीवरून गर्लगुंजी- राजहंसगड क्राॅस रस्त्याची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव खानापूर हद्दीवरून गर्लगुंजी ते राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासून ते बेळगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूर्ण केले. परंतु बेळगांव हद्दीतील राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.दोन तालुक्याच्या मधील रस्त्याची दुरावस्था झाल्याने केवळ अर्धाकिलोमिटर अंतर …

Read More »

मंत्री शशिकला जोल्लेचा मडवाळमध्ये सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी खानापूर तालुक्यातील मडवाळ गावाला नुकताच धावती भेट दिली.यावेळी गावच्या वेशीत त्यांचे ग्रामस्थाच्यावतीने सत्कार सोहळा पार पडला.त्यानिमित्त गावचे सुपुत्र व खानापूर येथील श्री बिरेश्वर को. ऑप. सोसायटी शाखेचे चेअरमन बाबासाहेब देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.तर शोभा कोलकार यांनी …

Read More »