बेळगांव : ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन ते तीन लाखांच्या आत आहे, अशी कुटुंबे बीपीएल कार्डसाठी पात्र आहेत. परंतु, सरकारी सुविधा आणि बाकीच्या फायद्यांसाठी ज्यांच्याकडे बंगला, गाडी व वार्षिक उत्पन्न ८ ते १० लाखांवर आहे, अशा व्यक्तीही बीपीएल कार्ड घेतल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात २२ हजारांवर बोगस बीपीएल …
Read More »ऊस उत्पादकांचे साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावून या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या जिल्हाधिकारी, साखर आयुक्त व अधिकाऱ्यांच्या धोरणाचा निषेध करत निजलिंगप्पा शुगर कंपनी येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ऊस उत्पादकांनी आंदोलन केले. बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली. मात्र, जिल्हाधिकारी …
Read More »हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव संपन्न
बेळगाव : हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. यावेळी श्री. व्ही. बी. उन्नी परिवाराकडून देण्यात आलेल्या 3 लाख 75 हजार रुपये देणगीतून श्री बाळूमामांची चांदीची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली होती. जयंती उत्सवानिमित्त सदर मूर्तीची मिरवणूक श्री बाळ्या स्वामी मठापासून करण्यात …
Read More »येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे समाजसेवकांनीच बुजवले
बेळगाव : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी गेल्या सोमवारी सुळगा (येळ्ळूर) गावातील सामाजिक कार्यकर्त्यांवर येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजवण्याची वेळ आली. येळ्ळूर (सु.) ते राजहंसगड हा रस्ता देसुर ते नंदीहळ्ळी रस्त्याला जोडला गेल्याने तो पुढे नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी तसेच …
Read More »रेशन वितरणात सर्व्हर डाऊनची समस्या : रेशन वितरकांनी दिले निवेदन
बेळगाव : रेशन वितरणाच्या नवीन सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज कर्नाटक राज्य सरकारी शिधावाटप वितरक संघटनेच्या वतीने अन्न व सार्वजनिक वितरण उपसंचालक बेळगाव यांना देण्यात आले. रेशन वितरणासाठी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. यामुळे शिधावाटप वितरक व ग्राहकांना त्रास होत असून शासनाने हा …
Read More »कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…
आयपीएलच्या धर्तीवर नियोजन … बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली असून, बेळगांव जिल्ह्यासाठी आपली टीम तयार झाली असून बेळगांव जिल्ह्याच्या टीम चे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून या बेळगाव टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फांऊडेशनकडे असून या स्पर्धा १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात बेंगलोर येथे …
Read More »उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणातील आरोपीना चार दिवसांची पोलीस कस्टडी
बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या चार आरोपीना आज अधिक चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने या आरोपीना चार दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. बेळगाव शहरातील अंजनेय नगर येथील रिअल इस्टेट व्यवसायिक संतोष पद्मण्णावर यांचा त्यांची पत्नी उमा पद्मण्णावर हिने आपल्या फेसबुक …
Read More »नूतन मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्वीकारला पदभार
बेळगाव : बेळगाव मनपाच्या नूतन आयुक्तपदी शुभा बी. यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बेळगावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. बेळगाव महापालिका आयुक्तपदी कार्यरत असलेले अशोक दुडगुंटी यांची बदली झाल्यानंतर आज नूतन आयुक्तपदी शुभा बी. यांची नियुक्ती झाली. माजी आयुक्त अशोक …
Read More »कित्तूर उत्सवाच्या पूर्वतयारीची जिल्हाधिकारी आणि आमदारांनी केली पाहणी
बेळगाव : उद्यापासून सुरु होणाऱ्या कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर येथील नियोजित कार्यक्रमस्थळाची पाहणी तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज कित्तूर येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. व्यासपीठ, जनतेची आसन व्यवस्था यासह संपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरु …
Read More »चोरीच्या संशयावरून गणपत गल्लीत महिलांना मारहाण
बेळगाव : दिवाळीपूर्वीच्या सणासाठी बेळगाव बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असते. अशातच महिलांना चोरीच्या संशयावरून स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना आज बेळगावच्या गणपत गल्लीत घडली. बेळगावच्या गणपत गल्ली मार्केटमध्ये आज सकाळी चोरीच्या संशयावरून महिलांना मारहाण करण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अशा घटनांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. स्थानिकांनी तातडीने खडेबाजार …
Read More »