बेळगाव : साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलच्या 1974 -75 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. या कार्यक्रमात हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. आर. आर. कुडतुरकर आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या अविस्मरणीय मेळाव्याची सुरुवात कुडतुरकर सर, दीपक परुळेकर, एस के इ …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना होणार; बैठकीत निर्णय
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 27/01/2025 रोजी सायंकाळी येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला येळ्ळूर मधील आजी- माजी सदस्य ग्राम पंचायत तसेच गावातील, जेष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा …
Read More »बेळगावात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे धाडसत्र
बेळगाव : चार दिवसापूर्वी आयकर खात्याने बेळगावात उद्योजक आणि व्यावसायिकांवर धाडसत्र राबविले होते. आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. बेळगावचे उपनिबंधक सचिन …
Read More »बेळगाव महापालिकेच्या जुन्या कार्यालयात भीषण आग
महत्त्वाची कागदपत्रे जळाली बेळगाव : रिसालदार गल्लीतील जुन्या महापालिका (तहसीलदार कार्यालय) कार्यालयातील गोदामाला अचानक आग लागण्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाला आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. बंद असलेल्या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आगीचा सदर प्रकार उघडकीस आला. …
Read More »मायलेकीचा मृत्यूमुळे श्वानाने खाणेपिणे सोडले!
बेळगाव: प्रयागराज महाकुंभमेळ्यात वडगाव येथील मेघा हत्तरवाठ आणि ज्योती हत्तरवाठ या मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेचा धसकाच्या चक्क घरातील श्वानाने घेतला असून त्याने खाणेपिणे सोडले आहे. घरातील मंडळी प्रयागराजला गेल्यापासून सनी नावाचा श्वान अस्वस्थ झाला. गेलेल्या दिवसापासून त्याने खाणेपिणे सोडले. एकूण श्वानाच्या वागण्यातून या दुर्घटनेचा अंदाज वर्तवला असल्याची व्यथा …
Read More »महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!
प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाकुंभमध्ये मोठी आग लागली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. महाकुंभमध्ये …
Read More »कुंभमेळ्याहून बेळगावला परतताना आणखी एकाचा हृदयविकाराने मृत्यू
बेळगाव : प्रयागराज यात्रेहून बेळगावला परतताना बेळगाव देशपांडे गल्लीतील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समजते. रवि जठार (६१) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते वृत्तपत्र विक्रेते होते. प्रयागराजहून बेळगावला परत येत असताना रेल्वेत हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. बेळगावातील एकूण पाच भाविकांचा मृत्यू झाल्याने बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त …
Read More »दोघांचे मृतदेह बेळगावात तर दोघांचे गोव्यात आणणार!
बेळगाव : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार भाविकांचे मृतदेह बेळगावला पाठवण्यात आले आहेत. बेळगाव येथील अरुण कोपर्डे (वय 61) व महादेवी भावनूर (वय 48) यांचे पार्थिव बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सायंकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. तर मेघा हत्तरवठ (२४), ज्योती हत्तरवठ (४४) या आई …
Read More »कुंभमेळ्यात मृत्युमुखी पडलेल्या चौघांचे मृतदेह “एअरलिफ्ट”ने आणणार
बेळगाव : महाकुंभमेळ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गाने “एअरलिफ्ट”ने आणण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे. प्रयागराज येथून मृतदेह रुग्णवाहिकेने दिल्लीला आणून तेथून विमानाने बेळगावला आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय अधिकारी एएसपी श्रुती आणि केएएस अधिकारी हर्षा उत्तर प्रदेशात गेले आहेत. जवळपास …
Read More »मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता समारंभ संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात काव्यसप्ताह कार्यक्रम, शिक्षक, पालक व विद्यार्थी कवी संमेलन, पुस्तक परीक्षण प्रात्यक्षिक, पुस्तक परीक्षण सादरीकरण, साने गुरुजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta