Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

हिंडलगा कारागृहात साहित्य फेकल्याचा व्हिडिओ महिनाभरापूर्वीचा : डीआयजी टी. पी. शेष

  बेळगाव : बेळगावमध्ये सध्या चर्चेत असलेल्या हिंडलगा कारागृहातील सीसीटीव्ही व्हिडिओबाबत उत्तर कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष यांनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फुटेज सुमारे महिनाभर जुने असून, त्या घटनेप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना …

Read More »

लोकसभा अध्यक्षांना युवा समिती सीमाभागचे पत्र

  बेळगाव : बेळगावसह सीमाभाग व परिसरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर भाषिक अत्याचार करणाऱ्या एका अत्यंत गंभीर सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी व महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्री. धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांविरोधात योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी आपल्या सन्माननीय कार्यालयास पत्राद्वारे मागणी केली …

Read More »

हिंडलगा कारागृह परिसरात गस्त वाढवणार : पोलिस आयुक्त

  बेळगाव : हिंडलगा कारागृहात अंमली पदार्थ फेकल्याच्या पार्श्वभूमीवर कारागृह परिसरात गस्त वाढवणार असल्याची माहिती हिंडलगा कारागृहाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांना दिली. पुढे बोलताना आयुक्त म्हणाले की, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही चौकशी करू. कोणता कॅमेरा आणि कोणती तारीख आधी तपासू. कारागृहात मोबाईल फोन …

Read More »

मराठी भाषिकांवरील अत्याचार त्वरित थांबवा; येळ्ळूर समितीचा प्रशासनाला इशारा

  येळ्ळूर : सीमाभागात येणकेण प्रकारे सामाजिक सलोखा बिगडविण्याचे काम सातत्याने घडत आहे. जाणून बूजून मराठी नामफलक फाडण्याचे काम समाजकंटकांनी राजरोसपणे सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही पोलीस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. यांना वेळीच आवरा नाही तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी जनता समर्थ आहे, असा कडक इशारा येळ्ळूर …

Read More »

खानापूर- बेळगाव महामार्गावरील प्रभुनगर पुलावर दुचाकी अपघात; खानापूरचा युवक ठार, एक गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील प्रभुनगर पुलावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात खानापूर येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच ही हृदयद्रावक घटना घडल्याने खानापूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर येथील निंगापूर …

Read More »

हिंडलगा तुरुंगाच्या आवारात अज्ञातांनी फेकले ड्रग्ज आणि मोबाईल 

  बेळगाव : नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान हिंडलगा तुरुंगाच्या आवारात काही अज्ञातांनी ड्रग्ज आणि मोबाईल फोन फेकल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पहाटे ३ वाजताच्या सुमारास मास्क घातलेल्या काही अज्ञातांनी हिंडलगा तुरुंगाच्या आवारात ड्रग्ज आणि मोबाईल फोन फेकले. सदर प्रकार म्हणजे हिंडलगा तुरुंगातील कैद्यांना ड्रग्ज आणि मोबाईल फोन पुरवले जात …

Read More »

बिजगर्णी प्राथमिक शाळेला गुरूवर्य एस. आर. मोरे यांच्याकडून कपाट भेट

  बिजगर्णी… येथील निवृत्त शिक्षक एस. आर मोरे यांनी आपल्या गावातील प्राथमिक शाळेला बावीस‌ हजार रुपयाचे किंमती कपाट भेट देऊन ऋण व्यक्त केले. साठ वर्षांपूर्वी त्यांचे प्राथमिक शिक्षण याच आपल्या मूळ गावी येथे झाले. महत्वाचे कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाटाची आवश्यकता असल्याचे मुख्याध्यापक पी. के. पाटील यांनी वाय पी नाईक यांच्याकडे बोलले …

Read More »

प्रेम बुरुडची क्राॅस कंट्री स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरांवर निवड

  कावळेवाडी…. येथील गुणवंत बाल धावपटू प्रेम यल्लापा बुरुड यांने नुकताच म्हैसूर येथे झालेल्या ६० वी क्रास कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरांवर गरुड झेप घेतली आहे. त्याने दोन कि.मि. अडथळा स्पर्धेत अवघ्या ५ मि. ४३ सेंकदात हे अवघड अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय स्तरांवर २४ जानेवारीला …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन सुभाष ओऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 डिसेंबर, 29 डिसेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडले. खेळगट ते इयत्ता तिसरी वर्गाचे स्नेहसंमेलन प्रारंभी या ‘विश्वाची आम्ही लेकरे’ व’ गगन सदन तेजोमय ‘या स्वागतगीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी …

Read More »

रामराजन यांची बेळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

  बेळगाव : बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची पदोन्नती झाली असून त्यांची बंगळुरू येथील सीआयडी विभागात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता रामराजन हे बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. राज्य सरकारने पोलीस दलात केलेल्या अंतर्गत बदल्यांच्या आदेशानुसार ही मोठी जबाबदारी …

Read More »