बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या कार्यकाळाची मुदत 14 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने नव्या महापौर, उपमहापौर निवडीच्या हालचालींना वेग आला असून याबाबतचा प्रस्ताव सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून महापालिकेच्या कौन्सिल विभागाने आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला आहे. प्रादेशिक आयुक्तांकडून औपचारिक …
Read More »शहापूर स्मशानभूमीतील विकास कामे अधांतरी; सुधारणेसाठी राखीव निधीची तरतूद
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे काम केव्हा सुरू होईल आणि केव्हा पूर्ण होईल? याची कोणीच खात्री देताना दिसत नाही. आठ वर्षे उलटले आले तरीही स्मार्ट सिटीतील कामे पूर्ण झालेली नाहीत.अशाच पद्धतीने शहरातील अनेक भागात विकास कामे खोळंबली आहेत. त्यातच शहापूर स्मशानभूमीतील विकास कामांसाठी बनविण्यात आलेला आराखडा कागदावरच राहिला आहे. स्मशानभूमी …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे 27 रोजी चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भाषेबद्दलच्या चर्चासत्रासह पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित उपरोक्त चर्चासत्र व पुस्तक प्रदर्शन गणपत गल्ली, बेळगाव येथील …
Read More »मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी
मराठी भाषा दिनी राजहंस गडावर होणार शिवरायांना व कुसुमाग्रज होणार अभिवादन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून मराठी सन्मान यात्रेला राजहंसगड येथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले होते. त्या प्रमाणे समाज माध्यम व येळ्ळूर, सुळगा, …
Read More »बेळगाव महानगरपालिकेच्या ताफ्यात दोन नवीन शववाहिका दाखल
बेळगाव : बेळगाव शहरातील नागरिकांना अंत्यसंस्काराच्या वेळी सोयीस्कर ठराव्यात, यासाठी महानगरपालिकेने दोन नवीन अत्याधुनिक शववाहिका खरेदी केली असून, आज दोन्ही आमदारांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील अंत्ययात्रांसाठी नागरिकांना वेळेवर सुविधा मिळावी, या उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून या शववाहिका घेण्यात आल्या आहेत. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, उत्तरचे …
Read More »कपिलेश्वर तलावात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह
बेळगाव : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर परिसरातील नव्या तलावात दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून चौकशीला सुरुवात केली. माहितीनुसार, तलावाच्या पाण्यावर मृतदेह तरंगताना काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ याची माहिती संबंधितांना दिली. समाजसेवक अवधूत तुडवेकर …
Read More »द्वितीय पी.यू.सी. वार्षिक परीक्षेसाठी सज्जता : कुमार गंधर्व सभागृहातील मार्गदर्शक आढावा बैठक
बेळगाव : येथील कुमार गंधर्व सभागृह येथे द्वितीय पी.यू.सी. वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यांतील नव्वदपेक्षा अधिक परीक्षा केंद्रांचे केंद्रप्रमुख, उत्तरपत्रिका प्रमुख, सहप्रमुख, विविध तालुक्यांतील बी.ई.ओ., तसेच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी चिकोडी …
Read More »गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून पतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामदुर्ग येथील रहिवासी उमेश बेडीगेर (३४) असे मृत व्यक्तीचे नाव असून उमेश याला दारूचे व्यसन होते. उमेश हा दारूच्या नशेत असताना क्षुल्लक कारणावरून …
Read More »तारांगण व मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन
बेळगाव : साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या तारांगण व नागप्पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने मराठी व कन्नड अशा द्विभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजता कॅन्टोन्मेंट स्कूल सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष गोव्याच्या चित्रा क्षीरसागर या भूषवणार …
Read More »कावळेवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण मूहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात संपन्न
कावळेवाडी…. येथील भजनी मंडळ व ज्ञानेश्वर पारायण मंडळ यांच्या वतीने दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पाच मार्चला तुकाराम बीज दिवशी गावात पारायण उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची मूहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर उपस्थित होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta