Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : सिमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन इतिहास आत्मसात करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यंदा देखील भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे पाचवे वर्ष असून सिमाभागात आयोजित होणारी ही सर्वात …

Read More »

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या काळ्या यादीत अर्थात रावडी शीटमध्ये नांव नोंदवलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानचे युवा कार्यकर्ते राजेंद्र बैलूर यांच्यावरील संबंधित गुन्हे तीन महिन्याच्या आत मागे घेण्यात यावेत, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने बजावला आहे. बेळगाव शहर परिसरात धडाडीचे युवा कार्यकर्ते राजेंद्र …

Read More »

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कोणकोणत्या योजना या विकास निगममधून राबविण्यात येतात. याच्या माहितीसाठी भोवी वडर समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी बेळगावात बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग, गोकाक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ओसीसीआयचे संचालक …

Read More »

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान आणि लहान चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वाद राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाच्या दृष्टीक्षेपात पोहोचला आहे. बेळगाव डायोसिजचे प्रमुख, बिशप डेरेक फर्नांडिस यांनी मुख्यमंत्रि सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांना तातडीच्या हस्तक्षेपासाठी मंगळवारी निवेदन …

Read More »

बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर सीबीआयचा छापा

  बेळगाव : टेंडर वाटप आणि बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या तीव्र आरोपांनंतर, दिल्लीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने मंगळवारी बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर अचानक छापा टाकला. कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनात घडलेल्या गैरप्रकारांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. सीबीआयचे अधिकारी अनेक महत्त्वाची कागदपत्रे तपासत असून, …

Read More »

टिपू जयंती नको, अब्दुल कलाम जयंती साजरी करा : प्रमोद मुतालिक

  बेळगाव : टिपू सुलतान जयंती साजरी करण्याऐवजी अब्दुल कलाम जयंती साजरी करावी. हिंदूविरोधी, कन्नडविरोधी आणि देशविरोधी टिपू जयंतीची आम्हाला गरज नाही, असे श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक म्हणाले. आजच्या अधिवेशनात आमदार अशोक यांनी टिपू सुलतान जयंती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली. मुतालिक यांनी या मागणीचा तीव्र निषेध केला. …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने केली. सुवर्णसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप नेते आणि शेतकरी नेते व कार्यकर्त्यांनी सुवर्णसौधकडे पायी मोर्चा काढला. निषेधस्थळापासून महामार्गावर पायी आलेले भाजप नेते आणि शेतकरी बेळगाव सर्व्हिस रस्त्यावरून पुढे निघाले. हलगा मार्गे सुवर्णसौधजवळ …

Read More »

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : शिवानंद महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांनी एकाच वर्षात भारतीय सैन्यात प्रवेश करून महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे. “एनसीसी ही भारतीय सैन्य तयार करण्याची पवित्र प्रक्रिया असून देशसेवेची ही सर्वोच्च संधी आहे. आज देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज आहे,” …

Read More »

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खादी राष्ट्रध्वजाचे अनावरण

  बेळगाव : सुवर्णसौधच्या भव्य पायऱ्यांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज प्रस्तुत करून त्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “आपल्या देशात अनेक जाती आणि धर्म आहेत. आपण धर्मनिरपेक्ष राहायला हवे. एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करावे, द्वेष करू नये. हे समतावादी …

Read More »

महाराष्ट्र आणि समितीचा हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात घेतला धसका!

  बेळगाव : कर्नाटकातील काही मंत्री आणि लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र, बेळगावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या विषयी मनात नेहमीच आकस असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काल दिवसभर सुवर्णसौध मध्ये बेळगाव शहरात मराठी भाषिक आणि महाराष्ट्रीय एकिकरण समितीने केलेल्या आंदोलनाची …

Read More »