Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

प्रेम प्रकरणावरून नावगे गावात दोन गटात हाणामारी

  बेळगाव : एका मुलीसाठी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नावगे गावात घडली. प्रेमप्रकरणावरून दोन गटात वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, वादाने हिंसक रूप धारण केले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणांमध्ये झालेल्या वादावादीत पंचाच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून घर, कार, …

Read More »

सीमावासीयांना सुद्धा वैद्यकीय सहायता निधीचे कवच!

  बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष उभा केला आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत. आजपर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे वाटप करण्यात आला आहे. हीच वैद्यकीय सेवा सीमाभागातील लोकांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता …

Read More »

परराज्यातील “गाजर” बेळगाव ब्रॅण्डच्या नावाखाली विकणाऱ्या दलालाचा पर्दाफाश!

  बेळगाव : बेळगावचा शेतकरी कधी अस्मानी संकटांशी तर कधी सुलतानी संकटांशी झुंजत आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय दलालांनी परराज्यातील भाजीपाला, कडधान्ये आणून बेळगाव ब्रँडच्या नावाखाली बाजारपेठेत विकू पहात आहेत. त्याचेच प्रत्यय आज झाडशहापूर येथील शेतकऱ्यांना आले. बेळगावचे मसूर, बासमती तांदूळ व इतर कडधान्ये जगप्रसिद्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत …

Read More »

एपीएमसी-जयकिसानच्या व्यापाऱ्यांना सहकार्याने व्यापार करण्याची सूचना

  बेळगाव : शहरातील एपीएमसी व जयकिसान या दोन बाजारपेठांना व्यावसायिक व्यवहार करण्यास परवानगी असून व्यावसायिकांनी परस्पर सहकार्य व सामंजस्याने व्यावसायिक व्यवहार करावेत, अशी सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी आयोजित एपीएमसी व जयकिसान मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कोट्यवधी रुपये खर्चून एपीएमसी …

Read More »

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित एसएसएलसी व्याख्यानमालेचे उद्घाटन

  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित, श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांनी यशवंत होऊन नावलौकिक वाढवावा पण त्याआधी माणूस बनून जगायला शिका त्याच बरोबर अभ्यासात सातत्य राखले पाहिजे, असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक व या …

Read More »

नामफलकांवर कन्नडसक्ती विरोधात युवा समितीचे महापौरांसह शहर पोलिस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून कन्नड संघटनांचे काही कार्यकर्ते बेळगाव येथील व्यवसायिकांना कन्नड भाषेत फलक लावण्यासाठी त्यांच्या दुकाने, आस्थापने, हॉटेल आधी ठिकाणी त्रास देऊन दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. मराठी व इंग्रजी फलकांवर काळे लावणे, बॅनर फाडणे, फक्त कन्नड फलक लावण्याचा अट्टाहास धरणे असे प्रकार करून दहशत माजवत …

Read More »

तानाजी गल्लीजवळील विहिरीत मृतदेह आढळला!

  बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातील तानाजी गल्ली रेल्वे फटका जवळील ब्रह्मलिंग मंदिरा शेजारील विहिरीत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर विहिरीत मृतदेहाचे पाय तरंगत असतानाचे आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. नववर्षाच्या सुरवातीलाच ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सदर घटना आत्महत्या आहे की खून याबाबत मार्केट …

Read More »

बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. बागेवाडी यांचा ‘नवहिंद’तर्फे सत्कार

  बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ची कार्यप्रणाली सर्व स्तरातील लोकांसाठी आशादायक आहे. क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात सोसायटीने पतपुरवठा करून सर्वसामान्यांची ‘पत’ वाढवण्याची किमया ‘नवहिंद’ने केलेली आहे. ही संस्था माझ्या ‘आई’सारखी असून मी छ. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून कार्य करत राहीन, असे उदगार बेळगाव जिल्हा नोटरी संघटनेचे नूतन अध्यक्ष जेष्ठ वकील …

Read More »

बेळगावातील कॉलेज रोडवर भीषण अपघातात युवक जागीच ठार

  बेळगाव : बेळगावातील कॉलेज रोडवर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला. कॉलेज रोडवर सरदार हायस्कूलच्या समोर आज सोमवारी पहाटे भरधाव मोटरसायकलवरील चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात पंकज नामक युवक रस्त्यावर उडून पडला. त्यामुळे …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या वतीने महारक्तदान शिबीर संपन्न

  बेळगाव : सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी गंगापुरी महाराज मठ, कोरे गल्ली शहापूर या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर श्री. माधव …

Read More »