खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात पार पडल्या.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डाॅ. विनायक पाटील, दंत चिकित्सक डॉ. सुनील शेट्टी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडा ध्वज फडकावून तसेच क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मार्च फास्ट करून पाहुण्यांना मानवंदना दिली.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या सौ. दिव्या नाडगौडा यांनी केले. संस्थेचे सचिव डाॅ. ज्ञानेश्वर नाडगौडा यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
विद्यार्थ्यांनी विविध खेळात भाग घेऊन आपल्या कलाचे प्रदर्शन घडविले.
कार्यक्रमाला संचालक एम. एफ. पाटील, अरविंद जोरापुरे, डाॅ. एन. एल. कदम, नारायण चोपडे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रेखा चौगुले हीने केले. क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी स्कूलच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.