Saturday , June 6 2026
Breaking News

17 जानेवारीच्या हुतात्मा दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Spread the love

 

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन पदाधिकाऱ्याांचा सत्कार

खानापूर : येत्या 17 जानेवारी रोजीच्या हुतात्मा दिनाला खानापूर तालुक्यातील सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.

तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारक येथे बैठक संपन्न झाली. प्रारंभी नूतन तालुकाध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे तसेच सचिव सीताराम बेडरे यांचा तालुका समितीच्या वतीने माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण, मारुती परमेकर, गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले, आबासाहेब दळवी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना बाळासाहेब शेलार म्हणाले, सीमाप्रश्न मार्गी लागण्याहेतूने पाठपुरावा करण्यासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचं आहे. त्यासाठी उपक्रम हाती घेण्यात यावेत.
निरंजन सरदेसाई म्हणाले, चळवळीसाठी आता काटेरी वाट आहे. ती सर करण्याची ताकद मनात ठेऊन जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे.

यावेळी प्रकाश चव्हाण, रणजित पाटील, आबासाहेब दळवी, रामचंद्र देसाई, सदानंद पाटील, अर्जुन देसाई, रमेश धबाले, पांडुरंग सावंत, माजी आमदार दिगंबर पाटील, पुंडलिक पाटील, आदींनी विचार मांडले.
शेवटी सचिव सीताराम बेडरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *