Wednesday , June 3 2026
Breaking News

मलप्रभा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

Spread the love

 

खानापूर : मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या ‘ त्या ‘ अनोळखी महिलेचा आज मृत्यू झाला.
सहा दिवसांपूर्वी म्हणजेच मागील मंगळवारी रात्रीच्या सुमारास खानापूर मलप्रभा नदीच्या पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या अनोळखी महिलेने केला होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या काही युवकांनी त्या वृद्धेला वाचविले होते. मात्र, या घटनेत तिच्या डोकीला जबर मार बसल्याने ती महिला गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवसापासून तिच्यावर उपचार केले जात होते. पण, उपचाराचा उपयोग झाला नाही. आज तिचा मृत्यू झाला.
सदर महिलेची ओळख कोणास सापडल्यास खानापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन खानापूर पोलिसांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *