Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरचे अभिजीत कालेकर राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यात पुरातन लोककलांना जागृती देत एक उत्तम कलावंत तसेच कलाकुसरतेचा अभ्यासक लोककलावंत अभिजीत द. कालेकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 ने 22 जून रोजी छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे सन्मानित करण्यात आले.

अभिजीत कालेकर हे एक खानापूर तालुक्यातील उत्तम कलाकार आहेत. मराठी लोक संस्कृतीची जोपासना, त्यासाठी केलेलं कार्य आणि कलेच्या सांस्कृतीक कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगीप्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री प्रा. बापू देसाई सर, नाना चव्हाण, सा. कार्यकर्त्या रंजीता तोर, तेजसच्या अध्यक्षा सौ. मेघा डोळस, महेंद्र तुपे, निवेदक पंकज शिंदे, प्रा. अजिंक्य लिंगायत, इत्यादी उपस्थीत होते. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *