Monday , September 21 2026
Breaking News

धावण्याच्या स्पर्धेत सुशील कुमार मऱ्याप्पा पाटील याचे सुयश

Spread the love

 

खानापूर : महाराष्ट्रीय राज्य पुणे मुक्कामी मंडळ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय इंटर स्कूल स्पर्धा 26-09-2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत बारा वर्षाखालील इयत्ता चौथी मध्ये शिकणारा कु. सुशील कुमार (मुळगाव गुंडपी तालुका खानापूर)  याने 60 मिटर व 80 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन दोन्ही गटामध्ये द्वितीय क्रमांक रौप्य पदक पटकाविले आहे. हा विद्यार्थी सर्वोदय इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर येथे शिकत आहे.
अशा या विजय स्पर्धकाचे सार्वजनिक गणेश मंडळ निंगापूर
गल्ली येथे मंडळाकडून खानापूरचे आमदार श्रीमान विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान व गौरव करण्यात आला. यापूर्वी अनेक ठिकाणी प्रथम क्रमांक घेऊन विजयी झाला आहे.
श्रीयुत एल. जी. कोलेकर ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक त्यांच्याकडून बेळगाव येथे प्रशिक्षण घेत आहे. आई-वडिलांचे अथक प्रयत्न व पाटील परिवाराची सदैव प्रेरणा व खानापूर तालुक्यातील सर्वांचे आशीर्वाद त्याला लाभत आहेत. अनेक संघ संस्था या विजयाबद्दल गौरव अभिनंदन करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *