Tuesday , April 21 2026
Breaking News

नंदगडमध्ये उद्या ‘जनता दर्शन’चे आयोजन

Spread the love

 

खानापूर : नंदगड गावात येत्या बुधवारी खानापूर तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जनतेच्या विविध तक्रारींवर अधिकारी तोडगा काढणार आहेत. त्याचा चांगला उपयोग करून घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे. खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड गावात बुधवार दि. 18 ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमात जनतेच्या विविध तक्रारींवर जागीच तोडगा काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून जनतेने आपल्या तक्रारी मांडून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, जनतेच्या समस्या जागेवरच सोडविण्याच्या उद्देशाने आपल्या खानापूरमध्ये प्रथमच शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचे अधिकारी खानापूर तालुक्यातील रायण्णा नंदगड येथे येणार आहेतजनता दर्शन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *