Monday , September 21 2026
Breaking News

सामाजिक कार्यकर्ते व खानापूर युवा समितीने दिला प्रवाशांना दिलासा

Spread the love

 

खानापूर : गेल्या बऱ्याच दिवसापासून खानापूर शहरातून गेलेल्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कठड्याची व लोखंडी सळ्यांची पडझड झाली असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे, यावर वर्तमान पत्र व समाजमाध्यमातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या तरीही प्रशासन ढिम्मच असल्याने खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या सहकार्याने बेळगावचे Facebook Friends Circle Team सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व अवधूत तुडवेकर यांनी कठड्याच्या दोन्ही बाजूनी सुरक्षा पट्टया बांधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यासाठी सुरक्षित केले, युवा समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे स्थानिकातून व प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *