Sunday , June 7 2026
Breaking News

करंबळ, बेकवाड गावची महालक्ष्मी जत्रा मोठ्या उत्साहात

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळसह होनकल, जळगे, रूमेवाडी, कौंदल महालक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.01 वाजता पाच गावचे ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच खानापूर व तालुक्यातील भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपणाने महालक्ष्मी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

यावेळी करंबळ, कौंदल, होनकल, जळगे, रूमेवाडी, खानापूर शहर, तसेच खानापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने या महालक्ष्मी यात्रा सोहळ्यास उपस्थिती दर्शविली आहे.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही यावेळी यात्रेत सहभागी होऊन लक्ष्मी मातेला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद प्राप्त करून तालुक्यातील जनतेला सुख, शांती व समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.

तसेच बेकवाड गावातील श्री महालक्ष्मी जत्रेतही अंजली निंबाळकर यांनी सहभागी होऊन देवी लक्ष्मीला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. करंबळ व बेकवाड या गावच्या महालक्ष्मी जत्रा वीस वर्षानंतर भरल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरात मराठी माध्यम विभागाचा शुभारंभ; शाळा प्रारंभोत्सव उत्साहात

Spread the love  खानापूर : खानापूर शहरात यंदापासून सुरू झालेल्या सरकारी माध्यमिक शाळेच्या मराठी माध्यम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *