Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड अखेर निलंबित

Spread the love

 

खानापूर : खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना अखेर निलंबीत करण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या बेळगाव येथील राहत्या घरांसह, निपाणी, अकोळ व खानापूर येथील सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गायकवाड यांच्याबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांनी अनेक ठिकाणी गैरमार्गाने मालमत्ता खरेदी केल्या होत्या. खानापूर तालुक्यात सुध्दा त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना धमकावून जमिनी खरेदी केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्याकडे नोंद झाल्या होत्या. त्याची दखल घेत लोकायुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या मालमत्तांची छाणणी सुरू होती. त्यानंतर आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *