Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर क्षत्रिय मराठा परिषद कार्यक्रमाच्या प्रचार पत्रिकेचे पूजन व प्रकाशन

Spread the love


खानापूर : क्षत्रिय मराठा परिषद खानापूर तालुका यांच्यातर्फे येत्या गुरुवार दि. 19 मे 2022 रोजी प. पू. श्री मंजुनाथ स्वामीजी यांचा सत्कार व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांच्या प्रचार पत्रिकेचे पूजन व प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे येत्या गुरुवार दि. 19 मे रोजी अखिल भारतीय क्षत्रिय मराठा समाजाचे महा धर्मगुरू श्री श्री श्री मंजुनाथ स्वामीजी यांचा सत्कार आणि त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाटील गार्डन, करंबळ क्रॉस खानापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमापुर्वी त्या दिवशी सकाळी 10 वा. जांबोटी क्रॉस येथे श्री जगतज्योती बसवेश्वर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन स्वामीजींच्या शुभहस्ते होणार आहे.


त्यानंतर शोभायात्रा काढण्यात येणार आहे तरी तालुक्यातील सर्व समाज बांधव युवक युवती बंधू-भगिनींनी या शोभायात्रेत भगवे फेटे भगव्या टोप्या भगव्या साड्या आणि भगवे ध्वज घेऊन बहुसंख्येने सहभागी होऊन शोभायात्रा व स्वामीजींचा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेने केले आहे.
उपरोक्त कार्यक्रमाच्या प्रचार पत्रिकेचे पूजन आणि प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. खानापूरचे ग्रामदैवत श्री चौराशी देवी, मरेम्मा देवी व सातेरी माऊली देवी या मंदिरामध्ये कार्यक्रमाच्या प्रचार पत्रिकेचे पूजन करून देवीचा आशीर्वाद घेण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई, सचिव रमेश पाटील, उपाध्यक्ष सिताराम बेडरे, शहराध्यक्ष अप्पय्या गुरव, अमृत पाटील, खजिनदार विठ्ठल पाटील, भीमसेना अध्यक्ष राजू कांबळे, निरंजन बिर्जे, शुभम पाटील, मंजुनाथ पवार, संदीप शेबले, बेळगाव युवा संघटनेचे मारुती सुतार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *