Monday , September 21 2026
Breaking News

मणतुर्ग्यात संगीत विशारद पदवी संपादन केलेल्या एम. व्ही. चोर्लेकरांचा सत्कार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्गे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व प्राथमिक शिक्षक एम. व्ही. चोर्लेकर यांनी संगीत विशारद (तबला वादक) पदवी संपादन केल्याबद्दल, कु. अंकिता शेलार हिने वकिली पदवी संपादन केल्याबद्दल तसेच यंदाच्या दहावी परीक्षेत तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रियांका देवलतकर यांचा सत्कार सोहळा मणतुर्गा पंचमंडळी, बालशिवाजी संगीत भजनी मंडळ, सुर्योदय ग्रुप व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक व्ही. व्ही. गुंडपीकर होते.
तर कार्यक्रमाला पंच कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळाराम शेलार, राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रल्हाद मादार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करून करण्यात आली.
तर पाहुण्याच्याहस्ते विशारद पदवी संपादन केलेले एम. व्ही. चोर्लेकर, वकील पदवी संपादन केलेल्या अंकिता शेलार, तर दहावीच्या परिक्षेत तालुक्यात व्दितीय क्रमांकाने पास झालेली प्रियांका देवलतकर आदीचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते संजीव वाटूपकर यांनी सत्कारमूर्तींच्या गुण गौरवाबद्दल विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला गावचे नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विलास पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *