Sunday , July 26 2026
Breaking News

महामोर्चाला हजारोंच्या संख्येने सामील व्हा : माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन

Spread the love

 

खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी खानापूर बाजारपेठ येथे मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने खानापूर बाजारपेठेत माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या नेतत्वाखाली जागृती दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, महेश प्रभू, डी. एम. भोसले, नारायण कापोलकर, शामराव पाटील, नारायण पाटील, मऱ्याप्पा पाटील, यशवंत पाटील, विवेक पाटील, दामोदर देसाई, निलेश पाटील, धनंजय पाटील, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, किरण पाटील, गोपाळ देसाई, विनायक सावंत, निरंजन सरदेसाई, राजाराम देसाई, देवाप्पा गुरव इत्यादी म. ए. समितीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते समवेत महामोर्चाची पत्रके वाटण्यात आली व दिगंबर पाटलांनी २७ च्या महामोर्चाला हजारोंच्या संख्येने सामील व्हा, असे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *