Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर आदर्श नगरात नगरपंचायतीच्या वतीने कुपनलिकेची सोय

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्टेट बँकेजवळील आदर्श नगरात नगरपंचायतींच्या वतीने नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या प्रयत्नातून नवीन कूपनलिका खोदून पाण्याची सोय नुकताच करण्यात आली.
यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार यांनी प्रास्ताविक करून नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या कार्याचे कौतुक केले. त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना दिलीप पवार म्हणाले की, गेली कित्येक वर्षे आदर्श नगरात पाण्याची सोय नव्हती. याची दखल नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी घेतली. व लागलीच नगरपंचायतीकडून कूपनलिका मंजुर करून पाण्याची सोय केली. लक्ष्मण मादार हे सतत समाजसेवेला वाहुन घेतलेले नगरसेवक आहे. त्यांच्या कार्याची स्तुती करावी तेवढी कमीच आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढले.
यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार यांच्या हस्ते यंत्रणाचे पुजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला नगरसेवक लक्ष्मण मादार, दिलीप पवार, ऍड. अरूण सरदेसाई, सामाजिक कार्यकर्ते महादेव काद्रोळकर तसेच आदर्श नगरातील ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *