Friday , April 17 2026
Breaking News

बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; कोल्हापूर येथील धक्कादायक घटना

Spread the love

 

 

कोल्हापूर : पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.

कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत आरोपी तरुणीवर वारंवार बलात्कार करत होता असं तरुणीने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. २०१८ पासून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तरुणीवर आरोपीने बलात्कार केला.

या घटनेप्रकरणी लक्षतीर्थ वसाहत येथील विश्वजीत सचिन जाधव या तरुणावर शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वेळा इच्छेविरुद्ध गर्भपात करायला लावल्याची धक्कादायक माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या कोल्हापूरचे शाहुपुरी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी

Spread the love  कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *