Friday , April 17 2026
Breaking News

ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळले!

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळदंगेमधील धोंडीबा नानासो फडतारे यांच्या ऊसाच्या शेतात अंदाजे तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत पुरलेल्या स्थितीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळंदगे गावातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. हुपरी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून अर्भक कोणाचं याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीराम नानासो फडतरे हे शेतात गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास गेले असता शेतात उकरल्याचे दिसून येताच शंका आली. त्यांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी मुलगा विनोद फडतारेला घटनेची माहिती दिली. विनोदला घटनेबाबत संशयास्पद प्रकार वाटताच पोलीस पाटील समीर मुल्लानी यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी हुपरी पोलिसांना माहिती देताच अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा खोदकाम केले असता मृतावस्थेत अर्भक आढळून आले. घटनास्थळी हँडग्लोव्हज, मीठ, व रक्त लागलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळून आल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर असल्याचे दिसून आले.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत इचलकंरजी विभागाचे डीवायएसपी विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले आणि घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी

Spread the love  कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *