Monday , August 17 2026
Breaking News

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपले

Spread the love

 

कोल्हापूर : प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. डी. वाय. पाटील यांचे सोमवारी वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोल्हापूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील होते. ते प्रसिद्ध डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक होते. त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या नावाने अनेक शैक्षणिक संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालये कार्यरत आहेत.

राजकीय कारकिर्दीत त्यांनी १९५७ ते १९६२ या काळात कोल्हापूरचे महापौर म्हणून काम केले. त्यानंतर १९६७ ते १९७२ या कालावधीत पन्हाळा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत शिक्षण आणि समाजसेवेला स्वतःला वाहून घेतले.

डॉ. पाटील यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा

Spread the love    पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *