Wednesday , July 9 2025
Breaking News

२४२ प्रवासी असलेले एअर इंडियाचे विमान कोसळले!

Spread the love

 

अहमदाबाद : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले तिथून धुराचे लोट निघत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेली नाही. हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विमानात २४२ प्रवासी होते.

मोठी हानी झाली असण्याची शक्यता

एअर इंडियाच्या एआय-१७१ (बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान – सीरियल नंबर ३६२७९) या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. २४२ प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते. तसेच यात दोन पायलटसह १२ क्रू सदस्य होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळच ही दुर्घटना घडली आहे. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात (७ किमी दूर) ते कोसळले. विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचे व्हिडीओंमध्ये दिसत आहे. दरम्यान, अहमदाबाद पोलीस व अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी; १७ जण बेपत्ता

Spread the love  उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *