एस. एस. चौगुले : कुर्लीत राष्ट्रीय गणित दिवस
निपाणी (वार्ता) : प्रसार माध्यमाची कोणतीही साधने नसलेल्या काळात श्रीनिवास रामानुजन हे सर्वात प्रभावशाली गणितज्ञ होते. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, गणिती विश्लेषण, संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि अपूर्णांक यामध्ये त्यांनी विलक्षण योगदान दिले. गणिती निकाल आणि समीकरणे संकलित करण्यापासून त्यांचे नाव शोधण्यापर्यंत, गणितातील त्यांच्या अनेक संशोधनांनी गणितीय संशोधनाचे नवे आयाम उघडले, असे मत रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य एस. एस. चौगुले यांनी सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे आयोजित राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रमात व्यक्त केले.
आर. आर. मोहिते यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डी. डी. हाळवणकर, श्रुती सित्रे, केदार मगदूम यांनी मनोगत व्यक्त केली. राजरत्न पाटील याने स्वतः बनविलेल्या गणित उपकरणाची माहिती दिली. यानिमित्त गणित उपकरणांचे प्रदर्शन मांडण्यात आले.
याप्रसंगी टी. एम. यादव, ए. ए. चौगुले, एस. ए. पाटील, यु. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. श्वेता बुधाळे यानी सूत्रसंचालन केले तर प्रेरणा पाटील यांनी आभार मानले.