कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा पुला नजीक मोटर सायकल चालकाचा अपघात होऊन जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव गाव समजू शकले नाही. सदर अपघात कागल पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील दूधगंगा पुलाजवळ कागलहून निपाणी कडे जात असलेल्या युवकाचा मोटरसायकल वरील ताबा सुटून रस्त्यावरील दुभाजकाला धडकून अपघात झाला. अपघातातील युवकाची दुचाकी दुभाजकाला धडकल्यानंतर उलट दिशेला येऊन पडली होती.
यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. त्याला 108 रुग्णवाहिकेतून कागल येथे उपचारासाठी नेण्यात आले.
घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.