Sunday , February 9 2025
Breaking News

दरोड्याच्या घटनेमुळे कोगनोळी अलर्ट

Spread the love

 

नागरिकांच्यात भीतीचे वातावरण : पोलीस यंत्रणा सतर्क
कोगनोळी : कोगनोळी येथे शनिवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक अलर्ट झाले आहेत. तर रविवार दिवसभर व रात्रभर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने गावातील प्रत्येक गल्लीत गस्त घालण्याचे काम सुरू आहे.
हणबरवाडी रोडवर असणाऱ्या सी वाय पाटील यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण करून चोरी केल्याने कोगनोळी सह परिसरातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास येथील माळी गल्लीतील दोन घरे, त्याचबरोबर हणबरवाडी रोडवर दोन घरे चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी त्यांना काही मिळाले नाही.
हणबरवाडी रोडवर असणाऱ्या सी वाय पाटील यांच्या घराचा मागचा दरवाजा मोडून घरात प्रवेश केलेल्या चोरट्याने पाटील व मुलगी ऐश्वर्या हिला जोरदार मारहाण करत तीस तोळे सोने व रोख रक्कम पळून नेली. यामुळे पाटील यांच्या शेजारी असणाऱ्या नागरिक व गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसभर गावातील मुख्य रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर चोरीच्या घटनेची चर्चा होती.
दिवसभर चर्चा झाल्यानंतर रात्री नागरिकांनी सतर्कता बाळगावी सांगण्यात येत होते. रात्री पोलिसांच्या वतीने घस्त घालण्याचे कामही सुरू होते. त्याचबरोबर गावातील युवक व गावकरी हे देखील रात्री उशिरापर्यंत बसले होते. घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासन तपास कामात गती असली तरी अद्याप चोरट्यांचा शोध लागला नाही. गावातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून गुन्ह्याचा शोध लावण्याचा प्रयत्न होत आहे. रात्रीपासून दिवसभर गावातील घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष देण्यात आल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याचे दिसून आले. चोरीच्या घटनेमुळे गावातील नागरिकांच्या वतीने रात्री घस्त सुरू करण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी बैठका घेऊन घस्त घालण्याचे सुरू केले आहे.
एकंदरीत चोरीच्या घटनेमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण असले तरी सर्वजण अलर्ट राहिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आप्पाचीवाडीत मंगळवारी मोफत सीईटी फॉर्म

Spread the love  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, कुरली, हदनाळ, भाटनांगनूर, सुळगाव, मतिवडेसह निपाणी तालुक्यातील बारावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *