Thursday , April 23 2026
Breaking News

अक्कोळमध्ये गॅरंटी योजनांची कार्यकर्त्यातर्फे पडताळणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : राज्य काँग्रेस कमिटीतर्फे निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात पाच गॅरंटी योजनांचा अक्कोळ गावातील लाभार्थीलना मिळत आहे का? कागद पत्रांची पूर्तता करूनही योजनांपासून वंचित असणाऱ्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने पडताळणी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी कार्यकर्त्यां तर्फे सन २०२४ सालामधील संकष्टी यादी कॅलेंडरचे प्रत्येक गल्लीमध्ये वितरण करण्यात आले. यावेळी धनाजी चव्हाण गुंडराव नाईक, प्रकाश मगदूम, अमर चौगुले, गंगाराम राऊत, अजय पुंडे, सुनील पुंडे, बी.एम. चिंगळे, रामा बन्ने, राजेंद्र कुरळुपे, राजेंद्र बामणे, संजय वारके उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाळकी यात्रेत दानोळीच्या बंडा शिंदे यांची बैलगाडी प्रथम

Spread the love  बंडा खिलारे ठरले द्वितीय मानकरी; भर उन्हात शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *