Monday , June 1 2026
Breaking News

बोरगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील १९ रोजी नगराध्यक्ष निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील नगराध्यक्षपदाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे पिंटू कांबळे यांनी आपल्या नराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता पुढील दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. १९) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी अध्यक्षपदाची निवड केली जाणार असून निवडणूक अधिकारी म्हणून निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे हे काम पाहणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्ष पदासाठी ‘मागासवर्गीय जाती’चे आरक्षण आले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आलेल्या या आरक्षणात पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून पिंटू कांबळे यांची २३ ऑगस्ट २०२४ ला बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांचा कार्य काल संपल्याने त्यांनी राजीनामा सादर केला असून १९ जानेवारीला नूतन अध्यक्षांची निवड होणार आहे. सोमवारी (ता.१९) रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत अर्ज भरणे, १२ ते १२.३० पर्यंत अर्जाची छाननी, १२.३० ते १ पर्यंत माघार आणि दुपारी १ नंतर अध्यक्षपद पदाची निवड केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडीच्या पार्श्वभूमीवर सुकानू समिती व हाय कमांड यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये नगरसेवक दिगंबर कांबळे यांची अध्यक्ष म्हणून निवड होणार असल्याची चर्चा झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यासाठी दिगंबर कांबळे यांचे नाव सर्वानुमते आघाडीवर आहे. ही निवड सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *