Friday , April 17 2026
Breaking News

शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल

Spread the love

 

राजू पोवार : भिवशीत रयत संघटनेतर्फे शेतकरी मेळावा

निपाणी (वार्ता) : जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून केव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य रहित संघटना कार्यरत आहे. संघटनेतर्फे यंदाच्या हंगामातील उसाला योग्य दर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडल्या नंतर प्रतिटन ४०० रुपयांची दरवाढ मिळाली आहे. या पुढील काळातही ऊस, सोयाबीन व इतर पिकांना योग्य दर मिळण्यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत होण्याचे आवाहन कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले. भिवशी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते.
पोवार म्हणाले, सर्वच साखर कारखाने राजकारणी मंडळींचे आहेत. कारखाने चालवणे कठीण असल्याचे सांगत असले तरी एकापेक्षा अधिक कारखाने त्यांनी सुरू केले आहेत. काटामारी, उसापासून मिळणारे उपपदार्थ आणि भ्रष्टाचारामुळे कारखानदार मालामाल होत असून शेतकरी मात्र कंगाल होत चालला आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. शिवाय त्यांना जाब विचारला पाहिजे. सरकारी शाळा गावाकडे टिकले पाहिजेत. त्यासाठी राजकारणी मंडळी पुढे येत नाही. त्यामुळे या पुढील काळातही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी जीवन जगत संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी बेनाडीतील बसवेश्वर क्रेडिट पतसंस्थेतर्फे संघटनेच्या कार्याला १० हजार रुपये आणि विठ्ठल गुरव यांच्याकडून २ हजार रुपये राजू पोवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण चेंडके, मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार, नितीन कानडे, अशोक क्षीरसागर, बबन जामदार, विजय गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. येथील नूतन शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा संघटनेतर्फे सत्कार झाला.
रयत संपर्क केंद्रातील अधिकारी विनोद जबडे यांनी, शेतकऱ्यांसाठीच्या स्वयंरोजगार योजना, विविध प्रकारचे अनुदान, सबसिडी याबाबतची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
मेळाव्यास सुभाष चौगुले, कलगोंडा कोटगे, संजय पोवार, एम. वाय. गोकार, महादेव पाटील, आनंदा गायकवाड, शिवाजी वाडेकर, शुभम मगदूम, सागर पाटील, सिद्धू मिरजे, सुनील पाटील, मधुकर पाटील, बाळासाहेब ऐवाळे, दादासाहेब चौगुले, अमित चौगुले, संजय जोमा, बाबासाहेब पाटील, सागर हवले, राजू उपाध्ये,अभय व्हनशेट्टी, रावसाहेब अतिवाटे, सचिन भिवशे, शुभम महाळुंगे, दादू चौगुले, रोहित पाटील, महादेव लोहार, निवास पाटील, सतीश येडुरे, जगदीश लोहार, प्रीतम कांबळे, मयूर पोवार, एकनाथ सादळकर, सविता पाटील, वैशाली कांबळे, स्वागता पाटील मंगल चौगुले, ताराबाई पाटील, वैशाली म्हाळुंगे यांच्यासह निपाणी तालुक्यातील विविध शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. आनंदा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *