Sunday , July 26 2026
Breaking News

गळतगा रेणुका यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस, शांतता कमिटीची बैठक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : गळतगा (ता.निपाणी) येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवार (ता.१३) आणि बुधवारी (ता.१४) होणार आहे. यात्रेच्यावेळी शांतता आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा कमिटी आणि पोलीस प्रशासनाची सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वाखाली शांतता बैठक पार पडली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओसीसीआयचे राज्याचे संचालक राजेंद्र पवार -वडर, ग्राम पंचायत अध्यक्ष आलगोंडा पाटील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेणुका यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये. बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांचे कोणतीही गैरसो होऊ नये. यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था चोख रहावी .रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ जनरेटर उपलब्ध असावा. जेणेकरून भाविकांचे चेंगराचेंगरी होणार नाही.भाविकांनाही कुठल्याही अडचणींना सामोरे जाऊ लागू नये,यासाठी ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची सूचना करण्यात आली. यावेळी विजय तेलवेकर, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब सदलगे, शंकर सुखसारे, राऊ वाघकपट्टे, रमेश कोळी, वैभव पत्तार, शिवू शेट्टी, राहुल नसलापुरे यांच्यासह ग्रामपंचायत, यात्रा कमिटी सदस्य व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *