Sunday , July 26 2026
Breaking News

आडी येथील मल्लिकार्जुन डोंगर मठात महाशिवरात्री सप्ताह कार्यक्रमाला प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आडी (ता.निपाणी) येथील मल्लिकार्जुन देव डोंगर मठ येथे महाशिवरात्रि सप्ताह निमित्त शिवानंद स्वामींच्या सानिध्यात मंगळवारपासून (ता.१०) विविध कार्यक्रमांना शिवानंद स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विना पूजनाने प्रारंभ झाला आहे. मंगळवार (ता.१७) पर्यंत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाशिवरात्री सप्ताह समितीने दिली आहे.
मंगळवारी (ता.१०) सकाळी अभिषेक, पूजा आरती, महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. रात्री ८.१५ वाजता प्रतिमा पूजन विनापूजन प्रार्थना आरती हा खंड विनासाहत भ्रमणासाठी विनाधारण करण्यात आले. त्यानंतर आणि येथील शिवपंथी आणि हरीपंथी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. बुधवारी सकाळी, सायंकाळी पूजा, पूजा आरती व प्रसादाचा कार्यक्रम झाला रात्री गजबरवाडी येथील नरसिंह महिला भजनी मंडळ व कुन्नूर येथील हरीपंथी भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.

गुरुवारी (ता.१२) नित्य पूजा आरती महाप्रसाद आणि शिवपुर वाडी येथील मल्लिकार्जुन भजनी मंडळ व भिवशी येथील दत्त पंथी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता.१३) सकाळ सायंकाळी नित्य पूजा प्रसाद आणि बेनाडी व बोळेवाडी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम, शनिवारी (ता.१४) नित्य पूजा आणि शिवापूरवाडी व सिदनाळ येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.
रविवारी (ता.१५) महाशिवरात्री एकादशी असून सकाळी अभिषेक, पूजा, आरती प्रसाद कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सहस्त्रकंठ वचन पारायण, वचन स्पर्धा, पारितोषिक पत्रण समारंभ होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील राजशेखर तंबाखे, सुरेश भांबुरे, सरलाताई पाटील, विलास आंबोळे, सुभाष महाजन, सदाशिव देवताळे, वज्रकांत सदलगे, राहुल नेष्टी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी पाच वाजता आडी बेनाडी शिवापुर वाडी भोळेवाडी येथील भाविकाकडून महा दासोह कार्यक्रम होणार आहे. यावेळी व्हीएसएम संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, हालशुगरचे अध्यक्ष एम. पी. पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक डॉ.सी. बी. कुरबेट्टी, संचालक सुरेश शेट्टी, किशोर चौगुले, संजय वैराट, संजय शिंत्रे, अमोल नागराळे, राजू कानडे, मनोहर कोरे, सतीश खोत यांचा सत्कार होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता मल्लिकार्जुन डोंगरावरून मल्लिकार्जुन पालखीचे गिरी मठामध्ये आगमन झाल्यावर स्वागत, आरती व मठांमध्ये पालखीची स्थापना व मुक्काम कार्यक्रम होणार आहे. यावेळी जैनवाडी आणि शिवापूर वाडी येथील भजनी मंडळाच्या कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.१६) द्वादशी असून अमावस्या महाप्रसाद, पालखीचे डोंगरावर प्रस्थान होऊन सकाळी ११ वाजता परत मठांमध्ये पालखी आणण्यात येणार आहे. त्यानंतर विना विसर्जन, भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी पूजा आरती व दुसरा महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी सात वाजता सप्ताहाची सांगता सुंठवडा वाटप प्रसाद बिदाई व आशीर्वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *