Monday , September 21 2026
Breaking News

बेनाडीत शनिवारपासून बिरदेव यात्रेनिमित्त भाकणुकीसह धनगरी ओव्यांचा कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरदेव यात्रा शनिवार (ता.४) ते रविवार (ता.५) अखेर आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धनगर समाजाचे अध्यक्ष अविनाश हजारे यांनी दिली.
यात्रेनिमित्त शनिवारी (ता.४) सायंकाळी येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराजवळ परिसरातील गावातील वालंग जमणार आहेत. त्यानंतर पालखीसह माळावरील मंदिरात कार्यक्रम होणार आहे. पुन्हा गावातील बिरदेव मंदिरात पालखी विसावणार आहे. रविवारी (ता.५) सकाळी बिरदेव मूर्तीस पुजाऱ्यासह मान्यवरांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता दूध घागऱ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक आल्यानंतर सायंकाळी चार वाजता वाघापूर येथील भगवान डोणे व सहकाऱ्यांचा भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. देवदर्शन नंतर रात्री आठ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रात्री दहा वाजता कब्बुर येथील मंडळाचा धनगरी ओव्यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. धनगर समाज बांधवांनी यात्रेस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अविनाश हजारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *