Monday , August 31 2026
Breaking News

सिदनाळ माळभागातील पाणी समस्या निकालात काढल्याने तहसीलदारांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सिदनाळ माळभाग येथील गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेला पाणीप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तहसीलदार सुरेश मुंजे यांचा ग्रामस्थां तर्फे सत्कार करण्यात आला.
माळभाग सिदनाळ परिसरातील पाणीपुरवठा मागील पंधरा दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाला होता. अनेकवेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही प्रश्न निकाली निघत नव्हता. चिक्कोडी येथे दलित समाजाच्या विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ग्रामस्थांनी हा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीदरम्यान डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर यांनी तहसीलदार सुरेश मुंजे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार मुंजे यांनी तातडीने तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामपंचायत पीडीओ यांच्याशी संपर्क साधत पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केल्यानंतर अखेर परिसरातील पाणीपुरवठा पूर्ववत झाला. यावेळी प्रा. आर. के. दिवाकर, मिथुन मधाळे, महेश धम्मरक्षित, संजय माने, सोहेल मुजावर, सतीश कांबळे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे रक्षाबंधन सण साजरा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *