Monday , June 15 2026
Breaking News

अक्कोळ मराठी मुलींच्या शाळेत चव्हाण परिवारातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील मराठी मुलींच्या शाळेत निपाणीतील उद्योजक किशोर आणि स्नेहा चव्हाण परिवारातर्फे १२० विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात. याशिवाय मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल मधील विद्यार्थिनींना ३० पॅड आणि कंपासाचे वितरण करण्यात आले. गेल्या दहा वर्षापासून चव्हाण परिवारातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करत असल्याने अक्केल परिसरात या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
राजेंद्र कडगावकर यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे यांनी, या उपक्रमाचे कौतुक करून समाजातील नागरिकांनी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे आवाहन केले. किशोर चव्हाण यांनी, सातत्याने हा उपक्रम आपण राबवत असून या पुढील काळातही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका ललिता प्रताप यांनी मनोगत व्यक्त करून शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी रुग्णास रामकुरे एसडीएमसी अध्यक्ष पोपट वड्डर, रवी पाटील यांच्यासह एसीडीएमसी पदाधिकारी व पालक उपस्थित होते. माधुरी मेस्त्री यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याने नगरपालिकेसमोरील नियोजित मोर्चा स्थगित

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मुगळे गल्ली, तवटे गल्ली आणि शानेदिवाण गल्ली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *