Sunday , August 23 2026
Breaking News

कन्नड संघटनांकडून पुन्हा महापालिकेवर दबाव; कर्नाटक समर्थक ठरावासाठी निवेदन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महापालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विभागीय आयुक्तांनी मागविलेला अहवाल तातडीने सादर करावा, या मागणीसाठी शुक्रवारी विविध कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

महापालिकेत वादग्रस्त ठराव मंजूर करून घेण्यासाठी गेल्या २६ मार्चपासून कन्नड संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. याच मुद्द्यावरून गडिनाडू कन्नडिगरा सेनेचे बलराम मासेशेट्टी आणि कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (शिवरामेगौडा गट) वाजिद हिरेकोडी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका कार्यालयात धाव घेतली.

महापालिका आयुक्त अनुपस्थित असल्याने शिष्टमंडळाने उपायुक्त सिद्धू हुल्लोळी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गेल्या तीन महिन्यांतील घडामोडींचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात मार्च महिन्यापासून झालेल्या आंदोलनांचा उल्लेख करण्यात आला असून २००५ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत असताना महापालिकेने मंजूर केलेल्या महाराष्ट्र समर्थक ठरावाचाही संदर्भ देण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ विधिज्ञ मोहन कातरकी यांच्या कायदेशीर मताचा आधार घेत प्रशासनाने कर्नाटकच्या बाजूने अहवाल सादर करावा, अशी मागणी संघटनांनी केली.

दरम्यान, या विषयावरून सीमाभागातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कन्नड संघटनांच्या वाढत्या हालचालींमुळे महापालिका प्रशासनावर दबाव वाढत असून आगामी काळात या प्रश्नावर आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *