Monday , August 17 2026
Breaking News

तलावातील पाणी पातळी खालावल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे नगरपालिकेचे आवाहन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : वेदगंगा नदी आणि येथील जवाहर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. अद्याप मोठा पाऊस न झाल्याने शिरगुप्पी ओढ्यातील जल स्तोत्र सुरू झालेले नाही. परिणामी तलावातील पाणी गढूळ गाळयुक्त बनले आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी अधिक वेळ लागत असून सर्व प्रभागात एकाच वेळी पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे इन्चार्ज प्रवीण कणगले यांनी केले आहे.
यावर्षी जून महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस आलेला नाही. पावसाच्या पार्श्वभूमीवर तलाव परिसरासह शिरगुप्पी ओढ्याची स्वच्छता करून पाण्याचे स्तोत्र येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण पाऊसच नसल्याने तलावात पाणी आलेले नाही. याशिवाय वेदगंगा नदीतील पाणी पात्र पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे जॅकवेल पासून पाणी उपसा करणे अडचणीचे ठरले आहे. तरीही शहर आणि उपनगरात टप्प्याटप्प्याने पाणी देण्यासाठी नगरपालिका प्रयत्नशील आहे. नळांना येणाऱ्या पाण्याचा दुरुपयोग टाळून गरजेपुरते जपून वापर करावा. शक्य असल्यास पिण्यासाठीच नळाचे पाणी वापरावे.इतर घरगुती कामांसाठी आपल्या परिसरातील कुपनलिका किंवा उपलब्ध पर्यायी पाणीस्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवावे.

सध्याच्या परिस्थितीत पाणी आठ दिवसांतून एकदाच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने पाण्याचा अपव्यव टाळून नगरपालिका प्रशासनाला सहकार करण्याचे आवाहनही पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *