Monday , August 17 2026
Breaking News

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळांचे कुटुंबीयांसह स्थलांतर सुरू

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना कुटुंबासह भटकंती करावी लागत असून चारा उपलब्ध होईल तेथे शेतात तात्पुरता मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तालुक्यातील काही भागांत हलका पाऊस झाला. मात्र निपाणी परिसरात सकाळ सायंकाळ हवेत गारवा असला तरी दिवसभर उन्हाची तीव्रता कायम आहे. परिणामी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मेंढपाळांना मेंढ्यांसह एका गावातून दुसऱ्या गावाकडे स्थलांतर करावे लागत आहे.मेंढपाळ कुटुंबे लहान मुलांसह घोडे, ट्रॅक्टर, टेम्पोतून प्रवास करत आहेत. डोक्यावर कडक ऊन असतानाही चारा व पाण्याच्या शोधात त्यांची भटकंती सुरू आहे. ज्या ठिकाणी मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध होईल, तेथे काही दिवस मुक्काम करून पुढील प्रवास केला जात आहे.
पावसाअभावी शेतांमध्ये हिरवळ दिसत नसल्याने मेंढपाळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे, जून महिना सुरू होऊनही उष्णतेचा प्रभाव कायम असल्याने शेतकरी आणि मेंढपाळ दोघेही आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *