Monday , August 17 2026
Breaking News

राज्यातील पालकमंत्र्यांची नियुक्त्या; सतीश जारकीहोळी यांच्याकडे तीन जिल्ह्यांची जबाबदारी

Spread the love

 

बेंगळुरू : राज्यातील विकासकामांना गती देणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाशी प्रभावी समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांना विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली असून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

राजधानी बेंगळुरूसह राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी वरिष्ठ मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे. बेळगाव, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांच्याकडे तीन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय जबाबदारी पुढीलप्रमाणे

जी. परमेश्वर – तुमकूर आणि चित्रदुर्ग

कृष्णबैरे गौडा – बेंगळुरू शहर आणि हासन

रामलिंग रेड्डी – बेंगळुरू दक्षिण आणि मंड्या

के., एच. मुनियाप्पा – बेंगळुरू ग्रामीण, बल्लारी आणि विजयनगर

यतीन्द्र सिद्धरामय्या – म्हैसूर आणि चामराजनगर

यु. टी. खादर – दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड आणि उडुपी

एम बी पाटील – विजयपूर आणि बागलकोट

प्रियांक खर्गे – कलबुर्गी आणि यादगीर

सतीश जारकीहोळी – बेळगाव, धारवाड आणि हावेरी

के. जे,. जॉर्ज – चिक्कमंगळूर आणि दावणगेरे

ईश्वर खंड्रे- बीदर आणि गदग

भैरती सुरेश – कोलार आणि चिक्कबळ्ळापूर

शरण प्रकाश पाटील – रायचूर आणि कोप्पळ

या निर्णयामुळे जिल्हास्तरावरील प्रशासन, विकासकामे आणि आपत्कालीन परिस्थितीतील समन्वय अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः बेळगाव जिल्ह्याच्या विकासकामांवर आता पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे थेट लक्ष राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *